विठ्ठलवाडी पोलिसांचे पथक परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एका व्यक्तीच्या वागण्यावर संशय आला. ही व्यक्ती आपल्यासोबत काही वस्तू घेऊन जात होती, ज्यावरून ती सामान्य विक्रेती असल्याचे भासत होते. मात्र, अधिक चौकशीसाठी जेव्हा त्याला रोखण्यात आले, तेव्हा या प्रकरणाचे गांभीर्य समोर आले. 55 वर्षांच्या इस्माइल मोहम्मद शफी अब्बासी नावाच्या या व्यक्तीने चक्क लेडीज सॅंडलचा वापर तस्करीसाठी केला होता.
advertisement
या सॅंडलच्या टाचेमध्ये (हील) अतिशय हुशारीने 36.3 ग्राम एमडी ड्रग्ज लपवून ठेवले होते. पोलिसांनी जेव्हा या चपलांची तपासणी केली, तेव्हा त्यातून सुमारे7 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोली आणि चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धाडसी कारवाई करण्यात आली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, मोहम्मद इस्माईल असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षल कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
