TRENDING:

Mumbai: रस्त्यावर उभा राहून लोकांना दाखवत होता मुलींचे फोटो, पोलिसांना कळालं अन्.., हाय प्रोफाईल कांड उघड

Last Updated:

दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: दक्षिण मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इथं एक व्यक्ती रस्त्यावर उभा राहून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना अडवत होती. त्यांना काही मुलींचे फोटो दाखवत होती. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे चौकशी केली असता हाय प्रोफाईल कांड उघडकीस आलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
News18
News18
advertisement

नेमकी कारवाई कशी झाली?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील डॉ. दा. भ. मार्ग पोलीस पथकाने सोमवारी दयानंद बिल्डिंग परिसरात सापळा रचला होता. यावेळी एक व्यक्ती रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवून, त्यांना आपल्या मोबाईलमधील काही मुलींचे फोटो दाखवत होता. तसेच व्हॉट्सअॅपवरून मुलींचे फोटो पाठवून ग्राहकांना शोधत होता.

पोलिसांना संशय आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस आलं. मुकेश कुमार रामजी यादव (५०) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला असून तो दलाल म्हणून काम करत असल्याचं तपासात उघड झालं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रात्री उशिरा झोपताय? वेळीच व्हा सावध, वाढतोय या आजारांचा धोका, Video
सर्व पहा

आरोपी मुकेश यादव हा ग्राहकांना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करून त्या बदल्यात मोठी दलाली कमवत होता. ग्राहकांशी संपर्क साधण्याचं आणि त्यांना मुलींचे फोटो दाखवण्याचं काम करत होता. याच दलालीतूनच तो बक्कळ पैसा कमवत होता. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या रॅकेटमध्ये मुकेश यादवसोबत आणखी कुणी या नेटवर्कमध्ये होतं का? तसेच तो कुठून मुलींना वेश्या व्यवसायात ओढत होता, याचा सखोल तपास डी. बी. मार्ग पोलीस करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: रस्त्यावर उभा राहून लोकांना दाखवत होता मुलींचे फोटो, पोलिसांना कळालं अन्.., हाय प्रोफाईल कांड उघड
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल