कॅप्टन प्रकाश पेठे मार्गवरील मच्छिमार नगरमधील चाळीच्या पहिल्या मजल्यावर पहाटे साधारण ४ वाजता अचानक आग लागली. धूर व ज्वाळा पसरताच परिसरात गोंधळ उडाला.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि बेस्ट कर्मचारी काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू करून जवळपास तासाभरात आग नियंत्रणात आणली. चाळीतून आग लागलेल्या ठिकाणाहून चार जणांना बाहेर काढून तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
advertisement
रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी यश खोत (वय 15) या मुलाला मृत घोषित केले. त्याच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे. तर, देवेंद्र चौधरी (वय 30) यांची प्रकृती चिंताजनक असून अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. तर, विराज खोत (वय 13) आणि संग्राम कुर्णे (वय 25) यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
आगीचं कारण काय?
आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. विजेचा शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीचे कारण काय, याबाबत तपास सुरू आहे.