कोकणात जाणाऱ्या ट्रेनची संख्या, फेऱ्या, सेवा वाढवल्या तरीही तिकिटांसाठी प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. कोणतीही ट्रेनचा विचार करा, त्या ट्रेनसाठी प्रवाशांना टिकिटासाठी मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोच. वंदे भारतची वाढती लोकप्रियता पाहता प्रवाशांकडून महत्त्वाची मागणी केली जात आहे. सुट्टीच्या दिवसांमध्ये मुंबई सीएसएमटी- मडगांव वंदे भारत एक्सप्रेससाठी प्रवाशांची गर्दी वाढत असल्याने, प्रवासी अधिक आरामदायी आणि सुलभ प्रवासासाठी ट्रेनचा विस्तार करण्याची मागणी करत आहेत. मुंबई कोकण गोवा कॉरिडॉरवरील वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी प्रवासी गट आता ट्रेनला तिच्या सध्याच्या आठ डब्यांच्या रचनेवरून 16 किंवा 20 डब्यांच्या रॅकमध्ये अपग्रेड करण्यासाठी आग्रही आहेत.
advertisement
27 ऑगस्ट 2025 पासून जालना- मुंबई आणि सोलापूर-मुंबई वंदे भारत सेवांची मालकी आणि प्राथमिक देखभाल नांदेड विभागाकडे अलिकडेच हस्तांतरित करण्यात आल्याने दोन देखभाल स्लॉट मोकळे झाले आहेत, ज्यामुळे ऑपरेशनलदृष्ट्या वाढ करणे शक्य झाले आहे. रेक अपग्रेड केल्याने क्षमता लक्षणीयरीत्या वाढेल आणि प्रवाशांच्या सीटसाठीची वेटिंग लिस्ट सुद्धा कमी होणार आहे. यामुळे महसूल वाढेल आणि प्रवाशांच्या आरामात सुधारणा होईल, विशेषतः गणपती, ख्रिसमस आणि नवीन वर्ष यासारख्या गर्दीच्या काळात प्रवाशांचा प्रवास अधिकच सोयीस्कर आणि सोप्पा होईल. या ट्रेनच्या Maintenance चं काम मडगावला केले जाते. त्यामुळे ही ट्रेन 16 ते 20 डब्ब्यांची होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.
16 ते 20 कोचची ट्रेन करणं टेक्निकल दृष्ट्या शक्य असून कोकणवासीयांचा खड्डेमुक्ते प्रवास होणार आहे. ट्रेन क्रमांक 22229/22230 सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची मालकी आणि प्राथमिक देखभाल कोकण रेल्वेच्या मडगावकडे हस्तांतरित करणे आवश्यक आहे. जेणेकरून येथून 20 डब्यांची वंदे भारत धावणे सोयीस्कर होईल. मडगाव येथील आवश्यक देखभाल, पायाभूत सुविधा प्राधान्याने विकसित कराव्यात, अशीही मागणी केली जात आहे. गणेशोत्सवात तात्पुरत्या कालावधीसाठी सीएसएमटी- मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसला 16 डबे जोडले होते. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत झाली होती.
नाताळ आणि नववर्षानिमित्त प्रवाशांची मागणी वाढेल. त्यामुळे या वंदे भारत रेल्वे गाडीच्या डब्यात वाढ करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, वाढीव कोचच्या मडगाव 'वंदे भारत' मधून प्रवास करण्यासाठी कोकणवासीयांना मोठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. सद्यस्थितीत 20 डब्यांच्या 'वंदे भारत' च्या देखभालीची कोणतीही सुविधा मध्य किंवा कोकण रेल्वेकडे नाही. यामुळे वाडीबंदरचे काम पूर्ण झाल्यावरच वाढीव डब्यांसह मडगाव 'वंदे भारत' चालवण्याचा मार्ग खुला होऊ शकेल, असे सांगितले जात आहे.
