कुर्ल्यामध्ये मित्राच्या बर्थडे पार्टीला जाणं एका तरूणाच्या अंगाशी आलं आहे. कुर्ला पूर्वेतील नेहरूनगरमधील गणेश हॉलच्या मागच्या बाजूला मित्राने त्याच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. हिच पार्टी उरकून बाईकने घरी जात असताना बुधवारी रात्री आकाश आग्रे नावाच्या तरूणाचा अपघाती मृत्यू झाला. आकाश आग्रे हा तरूण चेंबूरच्या नागेवाडी परिसरातील रहिवासी होता. घरी जात असताना त्याची बाईक रस्त्याच्या शेजारी असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊ धडकली, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
advertisement
मित्राच्या बर्थडेचं निमित्त म्हणून आकाशने दारू प्यायली होती. दारूच्या नशेमध्येच आकाशने कोणत्याही मित्राला घरी जात असल्याचं न सांगता बाईकने निघाला. सांताक्रूझ- चेंबूर लिंक रोड पुलावरील कुर्ल्यातील डेअरी रोडवरील असलेल्या चढावरच्या डिव्हायडरवर तरूणाची बाईक आदळली. बाईकवरील नियंत्रण सुटल्यामुळे बाईक थेट दुभाजकावर जाऊन आदळली. या अपघातामध्ये त्या तरूणाच्या तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. तिथल्या स्थानिकांनी त्याला तात्काळ राजावाडी रूग्णालयात दाखल केले. पण त्याला लगेचच डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
