मध्य रेल्वे – मेन लाईनवरील मेगाब्लॉक
कुठे: माटुंगा – मुलुंड दरम्यान
वेळ: सकाळी 11:05 ते दुपारी 3:45
मुख्य मार्गावर अप आणि डाऊन जलद मार्ग बंद राहणार असल्याने अनेक फास्ट लोकल्स स्लो मार्गावर चालवण्यात येणार आहेत.
सीएसएमटीहून 10:36 ते 3:10 दरम्यान सुटणाऱ्या सर्व डाउन फास्ट लोकल्सना माटुंग्यानंतर स्लो मार्गावर वळवले जाईल. या गाड्या मुलुंडपर्यंतच्या सर्व ठरलेल्या स्थानकांवर थांबतील आणि मुलुंडनंतर पुन्हा जलद मार्गावर परत येतील.
advertisement
ठाण्याहून 11:03 ते 3:38 दरम्यान सुटणाऱ्या अप फास्ट लोकल्सही मुलुंडनंतर स्लो मार्गावर चालतील. त्या माटुंगा पर्यंत प्रत्येक ठिकाणी थांबल्यानंतर पुन्हा अप जलद मार्गावर वळतील.
या बदलांमुळे काही गाड्या अंदाजे 15 मिनिटे उशिराने धावतील.
मध्य रेल्वे – ट्रान्स हार्बर लाईन बंद
कुठे: ठाणे – वाशी/नेरूळ
वेळ: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10
या कालावधीत ट्रान्स हार्बर मार्गावरील सर्व लोकल सेवा पूर्णपणे बंद राहतील.
ठाणे–वाशी/नेरूळ/पनवेल अप आणि डाऊन लोकल्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वे – बोरिवली ते गोरेगाव मेगाब्लॉक
कुठे: बोरिवली – गोरेगाव दरम्यान
वेळ: सकाळी 10:00 ते दुपारी 3:00
पश्चिम रेल्वेच्या धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने या दरम्यानच्या लोकल्सना जलद मार्गावर चालवले जाईल.
गोरेगाव – बोरिवलीदरम्यानची नियमित स्लो सेवा ब्लॉकदरम्यान उपलब्ध राहणार नाही.
काही लोकल सेवांना रद्द करण्यात येणार असून, अंधेरी आणि बोरिवलीला जाणाऱ्या काही गाड्या हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत चालवण्याची व्यवस्था केली आहे.
प्रवाशांना सूचना
रेल्वे प्रशासनाने सांगितले की अभियांत्रिकी व देखभाल कामे सुरक्षित आणि विश्वासार्ह रेल्वे सेवेसाठी अत्यावश्यक आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी, वेळापत्रक तपासावे आणि शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा.






