गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अयशस्वी
न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने हा निर्णय दिला. "अभियोजन पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरवता येणार नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने म्हटले की, "अभियोजन पक्ष आरोपींविरुद्ध गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अयशस्वी ठरले आहे. आरोपींनी हा गुन्हा केला आहे, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, त्यामुळे त्यांची दोषसिद्धी रद्द केली जात आहे."
advertisement
आरोपींकडून वकिलांचे आभार
राज्यातील विविध तुरुंगांमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आलेल्या आरोपींनी उच्च न्यायालयाचा निकाल ऐकल्यानंतर आपल्या वकिलांचे आभार मानले. त्यावेळी त्यांना भावना देखील अनावर झाल्या होत्या.
सर्व शिक्षा रद्द, निर्दोष मुक्त
दरम्यान, 2015 मध्ये एका विशेष न्यायालयाने या प्रकरणातील 12 जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा तर उर्वरित सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या सर्व शिक्षा रद्द करत आरोपींना निर्दोष मुक्त केले. जर हे आरोपी इतर कोणत्याही प्रकरणात वांछित नसतील, तर त्यांना तात्काळ तुरुंगातून सोडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
