26–27 डिसेंबरला मोठा परिणाम
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, 26 आणि 27 डिसेंबर रोजी रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर लोकल सेवा प्रभावित राहणार आहे. या कालावधीत लोकलच्या एकूण 317 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये शनिवारी (27 डिसेंबर) तब्बल 277 लोकल फेऱ्या रद्द होणार असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.
advertisement
Online Ticket: UTS वर लोकलचं तिकिट काढणाऱ्यांसाठी रेल्वेचं नव फर्मान, आता प्रवाशांना प्रिंट...
महिनाभर चालणार मेगाब्लॉक
पश्चिम रेल्वेचा हा मेगाब्लॉक 18 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या काळात कांदिवली–बोरिवलीदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील महत्त्वाची कामे केली जाणार आहेत. यामध्ये ट्रॅकशी संबंधित कामे, सिग्नलिंग यंत्रणेतील बदल तसेच इतर तांत्रिक कामांचा समावेश आहे.
लोकल फक्त गोरेगावपर्यंत
मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांच्या प्रवासावर परिणाम होणार आहे. काही लोकल गाड्या फक्त गोरेगावपर्यंतच चालवल्या जाणार आहेत तसेच काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. याबरोबरच काही लोकल नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावण्याची शक्यता आहे. यामुळे नियमित प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रवाशांना आवाहन केले आहे की, मेगाब्लॉकदरम्यान रद्द किंवा बदललेल्या लोकल सेवांची माहिती अधिकृत वेबसाइट, मोबाइल ॲप किंवा सोशल मीडिया हँडल्सवरून घ्यावी. गैरसोय टाळण्यासाठी नियोजन करूनच प्रवास करावा, असेही रेल्वेकडून सांगण्यात आले.






