VIDEO : उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक खेचला अन् राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, भर पत्रकार परिषदेत पिकला हशा!

Last Updated:

Raj Thackeray Laughter in Press Conference : पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना हसत हसत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातून माईक घेतला अन् खणखणीत उत्तर दिलं.

Raj Thackeray Laughter in Press Conference
Raj Thackeray Laughter in Press Conference
Uddhav Raj Thackeray Alliance : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंनी अखेर एकत्र येण्याचा निर्णय जाहीर केला अन् महाराष्ट्रात एकच जल्लोष पहायला मिळाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात बीएमसी निवडणूकसाठी युतीची घोषणा करण्यात आली. तर महाराष्ट्रात दोन्ही पक्ष निवडणूक लढवणार आहेत. अशातच आता मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत एक भन्नाट किस्सा पहायला मिळाला.

पत्रकार परिषदेत काय घडलं?

उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक असेल, त्यांना त्यांच्याकडेच कार्यकर्तेच राहणार नाही, असं भाजपची लोकं म्हणतायेत. त्यावर कोण भाजपची लोक? असा सवाल राज ठाकरेंनी केला. त्यावर पत्रकाराने रावसाहेब दानवे यांचं नाव घेतलं. रावसाहेब दानवे प्रतिक्रिया देण्याच्या पातळीचे तरी ते राहिलेत का? त्यांना त्यांच्या पक्षात देखील कुणी विचारत नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर हसत हसत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हातातून माईक घेतला अन् खणखणीत उत्तर दिलं.
advertisement

भर पत्रकार परिषदेत हशा पिकवला

राज ठाकरेंनी हातात माईक घेतला अन् दोन सेकंदात असं उत्तर दिलं की सगळेत हसले. मला असं वाटतं की उत्तरं देवांना द्यावीत दानवांना नाही, असं राज ठाकरे म्हणाले अन् भर पत्रकार परिषदेत हशा पिकवला. तर मागे उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी शिट्या आणि टाळ्या वाजवत राज ठाकरेंना दाद दिली. तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि आमचाच होणार, असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
advertisement

लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या

दरम्यान, शिवसेना आणि मनसेची युती झाली हे आम्ही जाहीर करत आहोत पण कोण किती जागा लढवणार, आकडा काय, हे नाही सांगणार. महाराष्ट्रात लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या आहेत. त्यात दोन टोळ्या जास्त झाल्यात, ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. ज्याची अनेक दिवस वाट पाहिली जात होती, असं म्हणत राज ठाकरे यांनी भाजप आणि शिंदेसेनेवर टिकास्त्र सोडलं आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
VIDEO : उद्धव ठाकरेंच्या हातातून माईक खेचला अन् राज ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, भर पत्रकार परिषदेत पिकला हशा!
Next Article
advertisement
Uddhav Thackeray Raj Thackeray: दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?
  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

  • दणक्यात युतीची घोषणा, पण जागा वाटपावर मौन, ठाकरेंच्या निर्णयामागचं 'राज'काय?

View All
advertisement