Mohammed Rafi : 2 लग्नं, 7 मुलं, अंत्ययात्रेत 10 लाख लोकांची गर्दी, असं होतं मोहम्मद रफी यांचं आयुष्य
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mohammed Rafi Birth Anniversary : बॉलिवूडचे दिग्गज गायक मोहम्मद रफी यांचा आवाज आजही लोक विसरलेले नाहीत. त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून ते आजही चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहेत. आज त्यांची 101 वी जयंती आहे.
advertisement
advertisement
मोहम्मद रफी यांचा आवाज इतका मधुर होता की तो थेट श्रोत्यांच्या मनाला स्पर्श करत असे. त्यांच्या निधनानंतर 45 वर्षे उलटून गेली असली तरीही ते आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत. आज त्यांची 101 वी जयंती आहे. मोहम्मद रफी यांनी दोन लग्नं केली होती आणि दोन्ही लग्नांतून त्यांना एकूण 7 मुलं होती. त्यांच्या अंत्ययात्रेत तब्बल 10 लाख लोक जमले होते.
advertisement
advertisement
मोहम्मद रफी यांनी दुसरे लग्न बिलकिस बानो यांच्याशी केले होते. हे लग्न 1945 साली झाले होते. त्या वेळी रफी यांचे वय 19 वर्षे होते. या लग्नानंतर रफी आणि बिलकिस यांना 6 मुले झाली. ज्यामध्ये तीन मुले आणि तीन मुली होत्या. शाहिद रफी, नसरीन रफी, यास्मिन रफी, हमीद रफी, सईद रफी, खालिद रफी आणि परवीन रफी अशी त्यांची नावे आहेत.
advertisement
मोहम्मद रफी यांच्यासाठी 1952 साली प्रदर्शित झालेला 'बैजू बावरा' हा सिनेमा त्यांच्या करिअरमधला टर्निंग पॉइंट ठरला. यानंतर त्यांनी यशाच्या शिखराकडे सातत्याने वाटचाल केली. त्यांच्या सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांमध्ये 'चौदहवीं का चांद', 'मैंने पूछा चांद से', 'आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे', 'बहारों फूल बरसाओ' आणि 'ये चांद सा रोशन चेहरा' या गाण्यांचा समावेश आहे.
advertisement
मोहम्मद रफी यांचे वयाच्या 55 व्या वर्षी निधन झाले. 31 जुलै 1981 रोजी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिग्गज गायक उदित नारायण यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की मोहम्मद रफी यांच्या अंत्ययात्रेत सुमारे 10 लाख लोक उपस्थित होते. त्या वेळी जोरदार पाऊस पडत होता आणि जणू संपूर्ण निसर्गही अश्रू ढाळत होता.







