'स्वत: 150 रुपयांची साडी नेसते', हिंदुस्तानी भाऊ जया बच्चनवर भडकला, पापराझींवरील त्या कमेंटवर संताप
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Hindustani Bhau on Jaya Bachchan : जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापराझींवर जोरदार टीका केली होती. यामुळे आता हिंदुस्तानी भाऊ जया बच्चन यांच्यावर भडकलेला पाहायला मिळत आहे.
advertisement
जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी पापराझींवर जोरदार टीका केली होती. आता हिंदुस्तानी भाऊ एका कार्यक्रमात जया बच्चन यांच्या वक्तव्यावर म्हणाला,"त्यांनी कपड्यांवर टीका केली आहे ना? काय नाव आहे अमिताभ बच्चन यांच्या पत्नीचे? जया बच्चन स्वत: 150 रुपयांची साडी नेसतात. कुराड बाजारातून त्या या साड्यांची खरेदी करतात आणि लोकांना गरीब म्हणतात. कसे घाणेरडे कपडे घालून येतात? असंही विचारतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जया बच्चन यांनी बरखा दत्त यांच्या ‘मोजो स्टोरी’च्या ‘वी द वुमन’ शोमध्ये पापाराझींविषयी म्हटलं होतं,“मीडियासोबत माझं नातं खूप चांगलं आहे, पण पापाराझींशी माझं नातं अजिबात चांगलं नाही. हे लोक कोण आहेत? घाणेरडी टाइट पँट घालून, हातात मोबाईल घेऊन बसलेले असतात. त्यांना वाटतं की फक्त मोबाईल असल्यामुळे ते तुमचा फोटो काढू शकतात आणि काहीही बोलू शकतात.
advertisement








