शिवतीर्थावर राज-उद्धव यांचं भावनिक मनोमीलन; बहिणीच्या औक्षणाने पुन्हा सांधलं तुटलेलं नातं, PHOTO

Last Updated:
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज एकत्र येण्याची घोषणा केली. विजयी भव! बहिणीने केलं औक्षण, शिवतीर्थावरील भावनिक क्षणाचे PHOTO समोर आले आहेत.
1/5
महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आजवर जे मराठी माणसाच्या मनात होतं पण घडलं नाही ते आज होणार आहे. हा सोहळा याची देही याची डोळा संपूर्ण महाराष्ट्र आज पाहणार आहे. ठाकरे बंधूंच्या युतीची आज अधिकृत घोषणा होत आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळं वळण मिळणार आहे.

advertisement
2/5
या युतीची घोषणा करण्याआधी उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थवर पोहोचले होते. तिथे दाखल होत त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना बहिणीने औक्षण केलं. विजयी भवं, असं म्हणत बहिणीने औक्षण केलं आहे.

3/5
या औक्षणाच्या विधीदरम्यान शर्मिला ठाकरे, रश्मी ठाकरे, अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांचंही बहिणीने औक्षण केलं आहे.

4/5
अवघ्या 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत आहेत. राजकीय पटलावर याचे कसे पडसाद उमटणार ते पाहावं लागणार आहे. आज हॉटेल ब्लू सीममध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा होत आहे. यापूर्वी अमित शाह यांच्यासोबतच्या युतीसाठी देखील हेच हॉटेल निवडण्यात आलं होतं.

5/5
यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मागच्या काही महिन्यात कौटुंबिक भेटीगाठी होत होत्या. बंधूंचं मनोमीलन झालं आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला ज्या गोष्टीची अपेक्षा आणि आशा होती ती आज पूर्ण होत आहे.

BMC Election: मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! मुंबई महापालिका निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण काय?
मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का
  • मतदानापूर्वीच काँग्रेसला २८ जागांवर धक्का! बीएमसी निवडणुकीत कोंडी, नेमकं कारण का

View All
advertisement