ठाणे खाडीत इराण, अफगाणचे पाहुणे दाखल, 'फ्लेमिंगो' पाहायला कसं जायचं? तिकीट दर आणि वेळापत्रक
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Thane Tourism: नाताळच्या सुट्टीत ठाणे खाडी परिसरात अनेकजण फिरायला जातात. याठिकाणी अफगाणिस्तान, इराणमधून खास पाहुणे दाखल झाले आहेत.
नवी मुंबई: ठाणे खाडी परिसरात हिवाळ्याच्या आगमनासोबतच निसर्गप्रेमींसाठी आकर्षण वाढले आहे. ऐरोली येथील कांदळवन क्षेत्रात मोठ्या संख्येने फ्लेमिंगो (रोहित पक्षी) दाखल झाले असून त्यांच्या दर्शनासाठी 21 डिसेंबरपासून बोट सफारी सुरू करण्यात आली आहे. नाताळच्या सुट्टीत ही सफर पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे. फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी हे इराण, अफगाणिस्तान आणि इस्त्रायलमधून हिवाळ्यात भारतात येतात. गुजरातच्या कच्छ भागातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून हे पक्षी समुद्रकिनारी आणि पाणथळ क्षेत्रात वास्तव्यास येतात.
स्थलांतरित पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यात सुमारे 200 हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. यामध्ये स्थानिक तसेच परदेशातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश आहे. दरवर्षी हिवाळ्यात फ्लेमिंगो येथे येतात आणि त्यानंतर पक्षी पर्यटनासाठी बोट सेवा सुरू केली जाते.
advertisement
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचा परिणाम यंदाच्या फ्लेमिंगो आगमनावर झाला. त्यामुळे त्यांचे आगमन काहीसे विलंबाने झाले आणि बोट सफारी 21 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. सध्या मात्र मोठ्या प्रमाणात रोहित पक्षी दाखल होत असून पर्यटकांचा प्रतिसाद वाढत आहे.
बोट सफारीला पर्यटकांचा प्रतिसाद
कांदळवन कक्षामार्फत सुरू करण्यात आलेल्या या बोट सफारीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. “रोहित पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होत आहे. नाताळच्या सुट्टीत पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी 21 डिसेंबरपासून पक्षी पर्यटन सुरू केले आहे,” अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादुरे यांनी दिली.
advertisement
बोट सफारीसाठी संपर्क व मार्गदर्शन
पक्षी पर्यटनासाठी बोट सेवेचे बुकिंग करण्यासाठी तसेच सफारीबाबत अधिक माहितीसाठी कांदळवन कक्षाच्या 9987673737 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
1) फ्लेमिंगो बोट सफारीचे दर
5 वर्षांखालील मुले : निःशुल्क
भारतीय शालेय विद्यार्थी : 30 रुपये
विदेशी विद्यार्थी : 55 रुपये
भारतीय प्रौढ : 55 रुपये
advertisement
विदेशी प्रौढ : 1910 रुपये
2) 24 सीटर बोट
सोमवार ते शुक्रवार : 530 रुपये प्रति व्यक्ती
शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस : 720 रुपये प्रति व्यक्ती
3) प्रिमियम बोट (6 व्यक्तींसाठी)
सोमवार ते शुक्रवार : 8500 रुपये
शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस : 10,500 रुपये
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 12:21 PM IST
मराठी बातम्या/ठाणे/
ठाणे खाडीत इराण, अफगाणचे पाहुणे दाखल, 'फ्लेमिंगो' पाहायला कसं जायचं? तिकीट दर आणि वेळापत्रक








