Thackeray Alliance : एक पॉडकास्ट अन् जवळ आले दोघे भाऊ, राऊतच नाही तर या मराठी अभिनेत्याचाही मोठा रोल
- Published by:Minal Gurav
Last Updated:
ठाकरे गट आणि मनसेची युती झाली. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले. ठाकरे बंधूना एकत्र आणण्यासाठी संजय राऊत यांच्याबरोबर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचाही मोठा वाटा आहे. राज ठाकरे यांनी स्वत: हे सांगितलं.
मुंबईत महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडली. शिवसेना ठाकरे पटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची घोषणा करण्यात आली. युतीची घोषणा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं निवसास्थान असलेल्या शीवतीर्थावर पोहोचले. ठाकरे बंधूंची युती मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड ठरली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
राज ठाकरे यांनी बोलताना ज्या मुलाखतीचा उल्लेख केला ती मुलाखती अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी घेतली होती. महेश मांजरेकर यांनी काही महिन्यांआधीच त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. Wacko Sanity या त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखीत बोलताना त्यांनी "कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे", हे वक्तव्य केलं होतं.
advertisement
advertisement











