मिळालेल्या माहितीनुसार, माहीमच्या कापड बाजारात ही धक्कादायक घटना घडली आहे. त्याचं झालं असं की एक इसम तोंडाला रूमाल बांधून मेडीकलमध्ये शिरला होता. सुरूवातीला तो मेडिकल बाहेर थांबला आणि त्याने एअरगन बाहेर काढली आणि तो आत शिरला. या दरम्यान दुकानदार आपल्या कामात व्यस्त असल्याने त्याची त्यावर नजर पडली नाही.
advertisement
पुढे जाऊन माथेफिरू आणखी आत शिरला आणि त्याने एअरगन थेट दुकानदारावर रोखली होती. माथेफिरू आपल्यावर बंदुक रोखतोय हे पाहून दुकानदार घाबरला नाही.याउलट त्याने एअरगन हातात पकडून माथेफिरुला दुकानाबाहेर हिसकावून लावलं होतं. ही संपूर्ण घटना मेडिकलमध्ये बसवलेल्या कॅमेरात कैद झाली होती.
या घटनेनंतर पोलिसांनी त्या माथेफिरुला ताब्यात घेतले आहे. सौरभ कुमार सिंह (वय 35) असे त्या इसमाचे नाव आहे. आणि त्याने पूर्व वैमनस्यातून ही घटना केल्याची माहिती आहे.त्यामुळे पूर्वीच्या वादातून केमिस्टवर एयर गन रोखल्याच तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे केमिस्ट मालकाच्या तक्रारीवर सौरभ कुमार सिंह विरोधात माहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीसह एयर गन देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
