3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
गुलाबी थंडी सुरू झाली आहे, त्यामुळे या थंडीचा आनंद घेण्यासाठी आणि फिरण्यासाठी बरेच लोक बाहेर पडत आहेत. घाटातून दाट धुकं पाहण्यासाठी लोक लोणावळ्यात जात आहेत. त्यामुळे घाटात वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. लोणावळ्याजवळील अमृतांजन ब्रिज ते खोपोली एक्झिट या दरम्यान सुमारे 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकेंडचा आनंद लुटण्यासाठी पर्यटनस्थळी निघालेल्या पर्यटकांना या कोंडीचा मोठा फटका बसला आहे.
advertisement
विकेण्डला बाहेर पडाल तर अडकाल
या कोंडीमुळे केवळ पर्यटकच नव्हे, तर आळंदी येथील कार्तिकी यात्रेसाठी निघालेले भाविक देखील रस्त्यात अडकले आहेत, ज्यामुळे त्यांच्या प्रवासात मोठी अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलीस तातडीने एक्स्प्रेस वेवर दाखल झाले आहेत. पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असून, प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विकेंडला सहसा होणारी ही वाहतूक कोंडी, प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे.
