TRENDING:

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच गिनीज बुकात! कारण वाचून अभिमान वाटेल

Last Updated:

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावर ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे बांधले जात आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील भव्य बोगदा जगातील सर्वांत रुंद ठरणार आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) यासाठी प्रस्ताव पाठवला असून गिनीज बुकच्या अधिकाऱ्यांनी प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणीही पूर्ण केली आहे.
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच गिनीज बुकात! कारण वाचून अभिमान वाटेल
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच गिनीज बुकात! कारण वाचून अभिमान वाटेल
advertisement

मुंबई-पुणे महामार्गावरील वाढती वाहतूक, घाटातील कोंडी आणि वेळेचा अपव्यय या पार्श्वभूमीवर आधुनिक इंजिनिअरिंगच्या मदतीने नवे पर्याय उभे केले जात आहेत. अशाच महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पामुळे मुंबई–पुणे प्रवासात मोठा बदल घडणार आहे. या प्रकल्पातील भव्य बोगदा आता जागतिक पातळीवरही लक्ष वेधून घेत असून त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

advertisement

उन्हाळी सुट्ट्यांत प्रवास सोपा, पुणे-मुंबईतून नागपूरला 106 स्पेशल ट्रेन, पाहा वेळापत्रक

मुंबई ते पुणे प्रवास करताना सध्या खंडाळा घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या समस्येवर उपाय म्हणून खोपोली एक्झिट ते लोणावळ्याजवळील कुसगावदरम्यान ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प राबवण्यात येत आहे. या अंतर्गत दोन्ही दिशेने प्रत्येकी चार मार्गिकांचे दोन बोगदे बांधले जात आहेत.

advertisement

यातील मुख्य बोगदा सुमारे 8.7 किलोमीटर लांबीचा असून त्याची पूर्ण झाल्यानंतरची रुंदी 23.5 मीटर आहे. त्यामुळे हा बोगदा जगातील सर्वांत रुंद बोगदा ठरणार आहे. दुसरा बोगदा 1.67 किलोमीटर लांबीचा आहे. प्रत्येक बोगद्यात चार मार्गिका आणि एक सेवा मार्ग असणार आहे.

या प्रकल्पात 950 मीटर लांबीचा केबल-स्टेड पूलही उभारण्यात येत आहे. हा पूल जमिनीपासून सुमारे 100 मीटर उंचीवर असून त्याची एकूण उंची 183 मीटर आहे. मजबूत इंजिनिअरिंगच्या आधारे तयार करण्यात आलेला हा पूल ताशी 250 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांनाही तोंड देण्यास सक्षम आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुढीपाडव्याचा थरारक सोहळा, 73 फूट उंचीच्या खांबावर चढून काढले जुने कापड, अमरावतीमधील परंपरा काय?
सर्व पहा

सुमारे 6,695 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाची एकूण लांबी 13.3 किलोमीटर आहे. हा मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबई–पुणे दरम्यानचे अंतर सुमारे 6 किलोमीटरने कमी होणार असून प्रवासाच्या वेळेत जवळपास 25 मिनिटांची बचत होणार आहे. सध्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून केबल-स्टेड पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित कामे पूर्ण करून हा मार्ग 1 मे रोजी वाहतुकीसाठी सुरू करण्याचा एमएसआरडीसीचा मानस आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे लवकरच गिनीज बुकात! कारण वाचून अभिमान वाटेल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल