मुंबई: कधीही न थांबणाऱ्या मुंबई सारख्या शहरात आपल्याला माणसं नेहमीच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करताना दिसतात. सध्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला एक शांततेचे ठिकाण हवं असतं. मुंबईत जर शांतता शोधायची असेल तर उद्यान हा उत्तम पर्याय आहे. मुंबईमध्ये आपल्याला अनेक उद्यानं पाहायला मिळतात. पण चारही बाजूने झाडे झुडपे आणि हिरवळ तसेच मोठा परिसर लाभलेली उद्यानं फार कमी पाहायला मिळतात.
advertisement
मुंबईतील मुख्य उद्यानांपैकी मोठा परिसर लाभलेलं एक उद्यान म्हणजे शिला रहेजा उद्यान होय. गोरेगाव पूर्वेकडील शिला रहेजा उद्यान गोरेगावकरांसाठी एक विरंगुळा केंद्र म्हणून उत्तम ठिकाण आहे. गोरेगावमधील अनेक नागरिकांसाठी व्यायाम किंवा लहान मुलांना खेळण्यासाठी ही जागा एक चांगला परिसर आहे. या ठिकाणी दररोज संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक शतपावली करण्यासाठी येतात, तर रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी अनेक पालक लहान मुलांना खेळण्यासाठी आवर्जून आणतात.
वय फक्त 19, आवाज अतिशय मधुर, मुंबई लोकलमध्ये गाणारी ही तरुणी कोण?, VIDEO
उद्यानाकडे जायचं कसं?
गोरेगावच्या या उद्यानाकडे कसं जायचं? हा अनेकांचा प्रश्न असेल. तर गोरेगाव पूर्व या ठिकाणी शिला रहेजा उद्यान वसलेले आहे. गोरेगाव रेल्वे स्थानकापासून या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला रिक्षा आणि बस हे दोन पर्याय आहेत. रिक्षाने साधारण 60 ते 70 रुपये होतात. 344 आणि 346 बसने तुम्ही फक्त पाच रुपयात शिला रहेजा उद्यानाला पोहोचता. या ठिकाणी प्रवेश शुल्क फक्त 5 रुपये आकारले जाते.
फोटोशूटसाठी बेस्ट पर्याय
सकाळी सुरु होणाऱ्या शिला रहेजा उद्यानात दिवसाची सुंदर सुरुवात करण्यासाठी म्हणजेच व्यायाम करण्यासाठी अनेक मंडळी या ठिकाणी येतात. या ठिकाणी वेगवेगळे ग्रुप एकत्र येऊन भेट देतात. जर तुम्हाला आऊटडोअर फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही नक्की इथे एकदा भेट दिली पाहिजे.