TRENDING:

Mumbai News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, ‘टॅटू’मुळे गंडला डाव, पोलिसांनी कसं पकडलं?

Last Updated:

Mumbai News: पीडितेने आरोपीच्या मानेवर विशिष्ट टॅटू असल्याची माहिती दिली होती. याच ओळखीच्या आधारे खरा गुन्हेगार पकडला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आजकाल तरुणांमध्ये टॅटू काढण्याची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र हाच टॅटू अनेकदा गुन्हेगारांसाठी अडचणीचा ठरत असून पोलिस तपासात तो महत्त्वाचा धागा ठरत असल्याचे अनेक प्रकरणांतून समोर आले आहे. गुन्हे उघडकीस आणणे असो वा अनोळखी मृतदेहांची ओळख पटवणे, टॅटू पोलिसांसाठी प्रभावी साधन बनत आहे.
Mumbai News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, ‘टॅटू’मुळे गंडला डाव, पोलिसांनी कसं पकडलं?
Mumbai News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, ‘टॅटू’मुळे गंडला डाव, पोलिसांनी कसं पकडलं?
advertisement

नवी मुंबई परिसरात गेल्या आठवड्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने पोलिसांची चिंता वाढवली होती. मध्यरात्री घरात घुसून 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी तत्काळ दोन स्वतंत्र पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पीडितेने आरोपीच्या मानेवर विशिष्ट टॅटू असल्याची माहिती दिली होती. याच ओळखीच्या आधारे खरा गुन्हेगार निष्पन्न झाला. चौकशीत तो बालगुन्हेगार असल्याचेही स्पष्ट झाले आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

advertisement

घरातून निघाले अन् भयंकर घडलं, 27 दिवस कुटुंबानं शोधलं, पण तोवर सगळं संपलं, छ. संभाजीनगर हळहळलं

याआधीही टॅटूमुळे अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांची उकल झाली आहे. 2021 मध्ये उल्हासनगर येथील तलावात सापडलेल्या मृतदेहाची ओळख मानेवरील टॅटूमुळे पटली होती. ती तरुणी रबाळे परिसरातून बेपत्ता असल्याचे उघड झाले आणि पुढील तपासात कुटुंबीयांवर संशय गेला. 2017 मध्ये रबाळे एमआयडीसीतील नाल्यात सापडलेल्या मृतदेहाच्या अवशेषांवर असलेल्या टॅटूमुळे एका तरुणीने पोलिसांशी संपर्क साधला होता. त्यातून बेपत्ता बहिणीचा धागा मिळाला आणि हत्या प्रकरण उघडकीस आले.

advertisement

View More

देश-विदेशातील घटनांमध्येही टॅटू ओळखीचा आधार ठरला आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटात मृत पावलेले व्यापारी अमर कटारिया, तुर्कीतील भूकंपात मृत पावलेले उत्तराखंडचे व्यापारी विजय गौड यांचीही ओळख टॅटूमुळे उघड झाली. तसेच महाराष्ट्रातील विविध हत्या प्रकरणांत टॅटूमुळे मृत व्यक्तींची ओळख पटवता आली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
डाळिंब आणखी महागले, शेवगा आणि गुळाची आज काय स्थिती? Video
सर्व पहा

या घटनांमुळे पोलिस तपासात टॅटूचे महत्त्व अधोरेखित झाले असून आधुनिक गुन्हेगारी तपासात तो एक निर्णायक घटक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: नवी मुंबईत 22 वर्षीय तरुणीसोबत भयंकर घडलं, ‘टॅटू’मुळे गंडला डाव, पोलिसांनी कसं पकडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल