TRENDING:

कोकणवासीयांना गुड न्यूज, अवघ्या 7 तासांत मुंबईहून विजयदुर्ग, चेक करा रो-रो सेवा वेळापत्रक

Last Updated:

कोकणात आज सागरी जल वाहतुकीचा नवा अध्याय सुरू झाला असून, रखडलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ही सेवा रविवारपासून सुरू होत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : कोकणात आज सागरी जल वाहतुकीचा नवा अध्याय सुरू झाला असून, रखडलेल्या मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ही सेवा 1 मार्च रविवारपासून सुरू झाली आहे. या सेवेद्वारे अवघ्या 7 तासांत मुंबईहून विजयदुर्ग येथे पोहोचता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सेवेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबई ते विजयदुर्ग  रो रो सेवा आजपासून सुरु 
मुंबई ते विजयदुर्ग  रो रो सेवा आजपासून सुरु 
advertisement

आशियातील ही सर्वात वेगवान रो-रो फेरी सेवा मानली जात आहे. ही फेरी दर बुधवारी आणि शनिवारी सकाळी 8 वाजता मुंबईवरून प्रस्थान करेल आणि दुपारी 3 वाजता विजयदुर्गला पोहोचेल. मुंबई परतीच्या प्रवासासाठी दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी 1 वाजता ही बोट विजयदुर्गहून प्रस्थान करणार असून, मुंबई येथे सायंकाळी 7 वाजता पोहोचेल.

advertisement

एक प्लेट डाळ-भात पडलं 98 हजाराला; जेवण ऑर्डर केलं पण तोंडचं पाणी पळालं, मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?

जल वाहतुकीला चालना देण्याच्या शासनाच्या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र सागरी मंडळाने मुंबई-कोकण मार्गावर प्रवासी रो-पॅक्स फेरी सेवा चालविण्यासाठी एमटूएम फेरीज यांना परवानगी दिली आहे. या प्रवासासाठी इकॉनॉमीसाठी 2,500 रु, प्रिमीयम इकॉनॉमी 4,000, दुचाकी वाहन, 1,000 रु, सायकल, 600 रु, चारचाकी 6,000 रुपये असे दर असतील.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

या सेवेच्या 625 पैकी शनिवारी रात्री साडेआठपर्यंत 446 तिकिटांची विक्री झाली होती. तिकीट विक्री रात्री उशिरापर्यंत होती. त्यामुळे पहिल्या दिवशी 450 हून अधिक प्रवासी प्रवास करणार असून, ही बोट सकाळी भाऊचा धक्का येथून सुटणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
कोकणवासीयांना गुड न्यूज, अवघ्या 7 तासांत मुंबईहून विजयदुर्ग, चेक करा रो-रो सेवा वेळापत्रक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल