"गप्प बस स्टोरी नको सांगू..." एका शब्दावरूनच भर थिएटरमध्ये एकमेकांमध्ये जुंपली..
या सीटी स्कॅनमध्ये त्याच्या डाव्या ब्रोन्कसमध्ये खोलवर धातूचा भाग असल्याचे आढळून आला. कोल्हापूरात फ्लेक्सिबल ब्रॉन्कोस्कोपीच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर मुलाला जसलोक हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले, जेथे ब्रॉन्कोस्कोपीमध्ये गिळण्यात आलेला एलईडी बल्ब ब्रोन्कस मध्ये आढळून आला. त्यानंतर डॉ. विमेश राजपूत आणि डॉ. दिव्य प्रभात यांनी मिनी थोरॅकोटॉमी (४ सेमी कट) केली, ज्यामुळे खेळण्यांच्या गाडीतून गिळलेला एलईडी बल्ब यशस्वीरित्या काढून टाकण्यात आला आणि मुलाच्या फुफ्फुसांचे कार्य पूर्ववत करण्यात आले. ॲनेस्थेसियोलॉजी सल्लागार डॉ. अनुराग जैन यांनी या शस्त्रक्रियेला मोठे सहकार्य केले.
advertisement
खूशखबर! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी; RBIमध्ये 120 जागांसाठी भरती
या केसबाबत मत व्यक्त करत जसलोक हॉस्पिटलमधील थोरॅसिस सर्जन डॉ. विमेश राजपूत म्हणाले, "आम्ही ऑपरेट केलेली ही सर्वात दुर्मिळ केस होती. एलईडी बल्ब फुफ्फुसामध्ये खोलवर गेला होता आणि समकालीन उपचार पद्धती तो बल्ब बाहेर काढण्यामध्ये अयशस्वी ठरल्या. काळजीपूर्वक नियोजन केलेल्या मिनी थोरॅकोटॉमीसह आम्ही सुरक्षितपणे एलईडी बल्ब बाहेर काढला आणि मुलाला जीवनदान मिळाले." ईएनटी सर्जन डॉ. दिव्य प्रभात म्हणाल्या, "मुलांमध्ये अस्पष्ट आणि सतत दिसणाऱ्या श्वसनसंबंधित लक्षणाकडे कधीही दुर्लक्ष करू नये. यामुळे अनेकदा न्यूमोनिया किंवा इतर सामान्य आजारांमुळे अशा केसचे निदान होण्यास विलंब होतो. प्रगत इमेजिंगद्वारे लवकर निदान केल्यास परिणामांमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते आणि गुंतागूंत टाळता येऊ शकते."
महाराष्ट्रात अचानक बदलली हवा, मुंबईसह 11 जिल्ह्यांबद्दल नवी अपडेट
या केसमधून मुलांमुधील गुंतागूंतीच्या श्वसनसंबंधित केसेसचे व्यवस्थापन करण्यामध्ये लवकर निदान, प्रगत इमेजिंग आणि स्पेशलिस्ट हस्तक्षेपाचे महत्त्व दिसून येते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या आरोग्यावरील प्रश्न उद्भवत आहे. लहान मुलं खेळत असताना आपला मुलगा काय खेळतोय? तो खेळत असताना कोणतीही गोष्ट तोंडात तर टाकत नाही ना? अशा अनेक मुद्द्यांकडे आई- वडिलांनी लक्ष द्यायला हवे. शिवाय लहान मुलं खेळत असताना त्यांना सहसा तरी गुळगुळीत खेळणं देणं टाळलं पाहिजे. आई- वडिलांनी या मुद्द्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे.