हजारो धावपटूंचा सहभाग
जानेवारी महिन्यात मुंबईत विविध सामाजिक संस्था आणि संघटनांकडून मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. मात्र टाटा मुंबई मॅरेथॉन ही शहरातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची मॅरेथॉन मानली जाते. यंदा या मॅरेथॉनमध्ये फुल मॅरेथॉन, हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर धावणे, एलिट रेस, दिव्यांगांसाठी विशेष धावणे, ज्येष्ठ नागरिकांची धावणे तसेच ड्रीम रन अशा विविध शर्यतींचा समावेश असणार आहे. या सर्व शर्यतींमध्ये हजारो धावपटू सहभागी होणार आहेत.
advertisement
'या' मार्गावरुन वाहतूक बंद
मॅरेथॉनचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), आझाद मैदान, मरीन ड्राइव्ह, वरळी, दादर, माहीम, वांद्रे तसेच आसपासच्या महत्त्वाच्या रस्त्यांवरून जाणार आहे. धावपटूंच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. त्यानुसार 18 जानेवारी 2026 रोजी पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता इतर वाहनांना अनेक प्रमुख रस्त्यांवर प्रवेश बंद असणार आहे.
या काळात दक्षिण मुंबई, वरळी, माहीम आणि वांद्रे परिसरातील काही भाग नो व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
