दक्षिण मुंबईमध्ये असणारी जागेची कमतरता, वाढलेली गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि रस्ते प्रशस्त करण्यासह सार्वजनिक सुविधा उभारण्याकरिता ४० एकर जागा निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पावले टाकली आहेत. विकासाच्या दृष्टीने पाऊले टाकण्यासाठी दक्षिण मुंबई भागात भुयारी रेल्वेमार्ग तयार करण्याचा पर्याय पुढे आला आहे. सध्याच्या रेल्वेमार्गाखालीच भुयारी रेल्वे उभारण्याचे नियोजन आहे.
पुणेकरांची PMP बस गेली तोट्यात, मार्गांची होणार फेररचना, असा आहे प्लॅन!
advertisement
मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर आणि मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही संकल्पना मांडली आहे. निवडलेल्या मार्गांवरील भुयारी रेल्वेची शक्यता तपासण्यासाठी 'पेडेको' आणि 'पॅसिफिक' या जपानी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपन्याना पुढच्या सहा महिन्यांमध्ये, तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यतेची तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याची जबाबदारी एमआरव्हीसी आणि बीएमसीने सोपवली आहे. दिवसेंदिवस मुंबईमध्ये वाढत चाललेली लोकसंख्या आणि रस्त्यांचे सुरू असलेल्या कामांमुळे भुयारी रेल्वेच्या मार्गाची चाचपणी केली जात आहे.
पुणे जिल्ह्यातील 'या' महामार्गासाठी निधी मंजूर; वेळ वाचवण्यासाठी मेगा प्लॅन तयार
भुयारी रेल्वेचे मार्ग पश्चिम रेल्वेच्या स्थानकांच्या आणि मध्य रेल्वेच्या स्थानकांच्या अनुषंगाने तयार करण्यात आले आहेत. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान धीम्या आणि जलद मार्गांवर चार मार्गिका आणि तीन स्थानके आहेत. चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यानचे अंतर ५ किलोमीटर आणि चारही मार्गिकांची रुंदी साधारण २५ मीटर आहे. प्रत्येक मार्गासाठी एक अशी एकूण चार भुयारे किंवा दोन मार्गिकांसाठी एक अशी दोन भुयारे असे पर्याय आहेत. चर्चगेट येथून ‘टनेल बोरिंग मशिन’द्वारे (टीबीएम) खोदकाम करणे शक्य असून मुंबई सेंट्रल परिसरात लोकल पुन्हा नेहमीच्या मार्गावर धावती ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे, असे सांगण्यात आले.
ऑफिसचा ताण कमी करून उत्साह वाढवतात ही रोपं, दिवसभर वातावरण ठेवतात प्रसन्न
एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-२ या प्रकल्पामध्ये समावेश असलेल्या सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी- सहावी मार्गिका मंजूर करण्यात आली. जमिनीच्या हस्तांतरणामुळे हा प्रकल्प रखडला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सीएसएमटी ते परळ आणि परळ ते कुर्ला अशा दोन टप्प्यांत प्रकल्प राबवला जाणार आहे. सीएसएमटी ते परळदरम्यान सध्या धीम्या आणि जलद अशा चार मार्गिका आहेत. जलद मार्गिकेवरून मेल- एक्सप्रेस आणि लोकल धावतात. सध्याच्या जलद मार्गावरून मेल- एक्सप्रेस सोडण्यासाठी सीएसएमटी- परळ लोकल बाजूला उभ्या करून जलद लोकल रवाना करण्याचे नियोजन सुरू आहे. सीएसएमटी ते परळदरम्यान जलद लोकलला केवळ भायखळा स्थानकावर थांबा आहे. परळ येथे लोकल पुन्हा नेहमीच्या मार्गावर येण्यासाठी जागेची उपलब्धता असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येते.
काही मिनिटात बनतात या ट्रेंडी हेअरस्टाईल, गरब्यात देतात कम्फर्टेबल-परफेक्ट लूक
मुंबईमध्ये भुयारी रेल्वे उभारताना प्रशासनाला अनेक अडचणींना आणि आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. प्रवाशांच्या दिवसेंदिवस वाढत असणार्या गर्दी नियंत्रणासह प्रभावशाली वायुविजन यंत्रणा उभारावी लागणार आहे. ३३ किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रोसाठी ३७ हजार कोटी रूपयांचा खर्च आला आहे. यामुळे ५ किलोमीटरच्या भुयारी रेल्वेसाठी तुलनेने कमी खर्च अपेक्षित आहे. सध्या उपलब्ध तंत्रज्ञान आणि टीबीएममुळे हे शक्य झाल्यास मुंबईचे पुढील १०० वर्षांसाठीचे नियोजन तयार होईल. शिवाय अरबी समुद्रालगत मोठी मोकळी जागा निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही शहराची वेगळी ओळख निर्माण होईल.