या प्रकल्पासाठी कोची मेट्रो रेल लिमिटेड यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोची जल मेट्रोच्या यशस्वी मॉडेलच्या धर्तीवर मुंबई महानगर क्षेत्रात जल मेट्रो सेवा सुरू करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. या संदर्भात महाराष्ट्र सागरी मंडळाने पुढाकार घेतला आहे.
Mumbai Local: महाशिवरात्रीलाच लोकलचा खोळंबा, मुंबईत तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, कधी आणि कुठं?
advertisement
ऑगस्ट 2025 मध्ये सादर झालेल्या प्राथमिक अहवालात 21 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. 10 नवीन जलमार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, वसई आणि मीरा-भाईंदर या परिसरांना जलमार्गाने जोडण्याची योजना आहे. या मार्गांमुळे शहरातील विद्यमान रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षणीयरीत्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
सध्या 21 जलमार्गांवर सुमारे 85 किमी अंतरावर जलवाहतूक सुरू आहे. प्रस्तावित 10 नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर एकूण जलमार्गांची लांबी सुमारे 200 किमीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळे लोकल, मेट्रो, बस आणि सागरी सेतू यांना पूरक असा आणखी एक पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध होईल.
मुंबई महानगर क्षेत्राची लोकसंख्या 2030 पर्यंत 3 कोटींहून अधिक होण्याचा अंदाज आहे. वाढत्या शहरीकरणामुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना जल मेट्रो हा पर्यावरणपूरक, जलद आणि सुरक्षित पर्याय ठरू शकतो. विस्तीर्ण किनारपट्टीचा लाभ घेत आधुनिक जलवाहतूक प्रणाली उभारण्यावर भर दिला जात आहे.
हा प्रकल्प ‘सागरमाला योजना 2.0’ अंतर्गत राबवण्याचा प्रस्ताव असून, 60 टक्के निधी केंद्र सरकार आणि 40 टक्के निधी राज्य सरकारकडून दिला जाणार आहे. सविस्तर आराखडा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सागरी मंडळाने खासदार रवींद्र वायकर यांना दिली असून, या प्रकल्पामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






