या चवीमागची परंपरा ८ दशकांपूर्वीची आहे. 1942 साली काशीप्रसाद तिवारी यांनी मरीन ड्राईव्ह स्टेशन परिसरात नटराज चाटची सुरुवात केली होती. आज या व्यवसायाची पाचवी पिढी, म्हणजेच राजनहरी शंकर तिवारी, ही परंपरा पुढे नेत आहेत. सध्या नटराज चाटच्या अनेक शाखा असून, जोगेश्वरी (पूर्व) येथील सद्भक्ती मंदिरासमोरच ही फेमस पाणीपुरी मिळते. नटराज चाटच्या पाणीपुरीची खासियत म्हणजे ती मिनरल वॉटरमध्ये तयार केली जाते.
advertisement
पाणीपुरीच्या पुऱ्या मल्टीग्रेन आट्याच्या असतात, ज्या शुद्ध तुपात तळल्या जातात. वापरले जाणारे चसर्व साहित्य उच्च दर्जाचे आणि स्वच्छतेचा विशेष विचार करून तयार केलं जातं. फक्त पाणीपुरीच नाही, तर येथे 21 प्रकारचे चाट पदार्थ उपलब्ध आहेत — रगडा पुरी, दिल्ली चाट, दहीपुरी, दही पकोडे अशा विविध चवींचा आनंद इथे घेता येतो. या पाणीपुरची किंमत 70 रुपयांपासून होते. तर वेगवगेळे चाट 80 रुपयांपासून मिळतात.