नाशिककरांचा लोकल प्रवास का रखडला?
नाशिकरोड ते कल्याण या मार्गावर आधीचा अनेक उपनगरीय गाड्या सुरु आहे. मात्र या दरम्यान लोकल सेवा सुरु करण्याच्या मागणीवर आता केंद्र सरकाने एका टोलवाटोलवी केली आहे. ज्यात कसारा-इगतपूरी या घाटाची रुंदी कमी आहे आणि लोकल गाड्यांची रुंदी जास्त या कारणामुळे ही सेवा शक्य नसल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे. शिवाय मार्गाची क्षमता, उपलब्ध पाथ, रोलिंग स्टॉक, पायाभूत सुविधा आणि देखभाल व्यवस्थेवर हा मार्ग अवलंबून आहे.
advertisement
खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिकरोड ते कल्याण या लोकल रेल्वे सेवेबाबात लोकसभेत पुन्हा एकदा मुद्दा उपस्थित केला आणि रेल्वे मंत्रालयाला याबाबत अनेक प्रश्न केले. पण मंत्रालयाने उत्तर दिले की ही सेवा तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होऊ शकत नाही त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकरांच्या पदरी निराशा पडली आहे. खरं पाहिलं तर नाशिकरोड ते कल्याण ही सेवा विद्यार्थी, शेतकरी तसे लघु व्यापारी आणि रोजंगारी करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची होती.
