देशी गायीच्या तुपाचा असाही वापर... या कंपनीनं केली ब्यूटी प्रॉडक्ट्सची निर्मिती
ब्रह्मचारिणी देवीचे महत्व
कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते. तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे. हजारो वर्षांच्या कठोर तपामुळे दुर्गेच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव मिळाले. देवीच्या या तपश्चर्येमुळे महादेव प्रसन्न झाले.
advertisement
ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने भक्ताला भक्ती, सिद्धी, ज्ञान, वैराग्य, संयम, त्याग आणि धैर्य प्राप्त होते, असे शास्त्रात म्हटले आहे
मुलाला अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी तिनं रिक्षा चालवली, थक्क करणारा प्रवास...
पूजन- नैवेद्य
सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आटोपल्यानंतर ब्रह्मचारिणी देवीचे षोडशोपचार पूजन करावे. या दिवशी देवीला दूध अथवा दुधापासून तयार केलेल्या मिठाईचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. तसेच देवीची दुसरी माळ दुर्वा किंवा झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करावी. केळीचा नैवेद्यही या दिवशी विशेष मानला जातो.