मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या स्थानिक नेत्याच्या पुतण्याने मुंबईमध्ये तिघांवर जीवघेणा हल्ला केला आहे. मुंबईच्या मुलुंड भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. स्थानिक नेत्याच्या पुतण्याने नशेच्या आहारी जाऊन हे कृत्य केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातून मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेले सजीव मलिक यांचे भाऊ युसूफ मलिक यांचा मुलगा सुलतान याने तिघांवर वार केले. नशेच्या आहारी जाऊन सुलतानने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मुलुंडच्या साईप्रेस आणि मुलुंड कॉलनी येथे ही घटना घडली आहे. हल्ला झालेल्या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
advertisement
(ही बातमी अपडेट होत आहे, सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 22, 2026 11:37 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai : मुंबईच्या रस्त्यावर तिघांवर सपासप वार, राष्ट्रवादी उमेदवाराच्या पुतण्याचा नशेमध्ये हल्ला
