TRENDING:

Mumbai News : मुंबईकरांनो लक्ष द्या! आजपासून 'या' वाहनांना शहरात नो एन्ट्री, नवे नियम लागू

Last Updated:

Mumbai Traffic Rule : मुंबई शहरातील प्रत्येकासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शहरात आजपासून वाहतूक नियमात बदल करण्यात आलेले आहे. नक्की कोणते बदल करण्यात आले असून वाहनचालकांनी कोणते नियम आहेत ते पाहूयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असून विविध विकासकामांमुळे रस्त्यांवरील उपलब्ध जागेवर अधिक ताण पडत आहे.वाढती बांधकामे आणि त्यातच होणारी अवजड वाहनांची वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेता मुंबई वाहतूक पोलिसांनी जड वाहनांच्या हालचालींवर नवे आणि कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
heavy vehicle entry ban in Mumbai from February 1
heavy vehicle entry ban in Mumbai from February 1
advertisement

मुंबईत आजपासून ट्रॅफिकचे नियम बदलले

हे नियम 1 फेब्रुवारीपासून अमलात आले असून दररोज सकाळी 8 ते 11 दरम्यान आणि संध्याकाळी 5 पासून रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील अवजड वाहणांना प्रवेश बंदी तर दक्षिण मुंबईत सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत निर्बंध जाहीर केला आहे. यामुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत आणि सुरक्षित व्हावी असा विश्वास पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

advertisement

'या' भागात होणार वाहतूकीचे कठोर नियम

मुंबई मधील दक्षिण भागात हे वाहतूक नियम अधिक कठोर करण्यात येणार आहेत. लक्झरी बससह सर्व अवजड वाहनांवर सकाळी 7 वाजल्यापासून मध्यरात्री 12 पर्यंत प्रवेशबंदी जाहीर करण्यात आली आहे. तर इस्टर्न फ्रीवेवर 24 तास अवजड वाहनांवर बंदी घालण्यात येईल. यामध्ये बस आणि काही अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला वगळता तसेच या कालावधीत केवळ अत्यावश्यक भाजीपाला, दूधविक्रेते, ब्रेड, बेकरी पदार्थ, पिण्याचं पाणी, पेट्रोल, डिझेल, आणि इतर काही वाहनांना प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

advertisement

त्याशिवाय दहिसरमधील श्रीकृष्णनगर मध्ये तीन महिन्यांच्या कालावधीसाठी क्रॉस रोड 2 वर एकेरी वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना क्रॉस रोड 3चा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे मुंबईकरांना या सर्व वाहतूक बदलांची नोंद घेऊनच घराबाहेर प्रवास करण्यासाठी पडावं असं अवाहान केलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी वातावरणात मोठे बदल, हवामान खात्याकडून अलर्ट
सर्व पहा

या बदलांमुळे येत्या काही दिवसांतच मुंबईतील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. इतर सर्व अवजड वाहने मध्यरात्रीपासून ते सकाळी 7वाजेपर्यंतच शहरात प्रवेश करू शकतात. पूर्व द्रुतगती महामार्गावर 24 तास अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे तसेच आजपासून पुन्हा एक घातक नियम लागू होणार असून याबाबत सर्व वाहतूकदारांची बैठक घेऊन राज्यभरात आंदोलन करण्याबाबतची चर्चा करणार असल्याचे डॉ.बाबा शिंदे, महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक अध्यक्ष व प्रतिनिधी महासंघाने म्हटले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News : मुंबईकरांनो लक्ष द्या! आजपासून 'या' वाहनांना शहरात नो एन्ट्री, नवे नियम लागू
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल