जाणून घ्या नवीन सुविधा कोणती?
लोकल ट्रेनचे तिकीट काढणे प्रवाशांसाठी अतिशय सोपे व्हावे यासाठी, यासाठी मध्य रेल्वेने आता नवीन सुविधा सुरू केली आहे. ती म्हणजे एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली आणि मोबाइल यूटीएस सेवेनंतर आता मोबाइल यूटीएस सहाय्यक. पहिल्यांदा ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही गेल्या 31 ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे.
advertisement
नेमका कसा फायदा प्रवाशांना याचा होणार?
या सुविधेमुळे फक्त 13 दिवसांतच रेल्वेने 20.33 लाख रुपये महसूल मिळवला आहे. जेव्हा तिकीट काढण्यासाठी प्रवाशी लाईनमध्ये थांबतात तेव्हा तिकडे 3 सहाय्यक व्यक्ती असतात जे प्रवाशांना तिकीट काढून देतात आणि त्यांचा वेळ वाचवतात. ज्यांना ' एम-यूटीएस सहाय्यक' असे म्हणण्यात येत आहे.
हे सहाय्यक त्यांच्या सोबत मोबाइल फोन आणि लहान तिकीट प्रिंटिंग मशीन घेऊन फिरतात. हे कर्मचारी होल्डिंग एरिया किंवा रेल्वे परिसरातील रांगेत उभ्या असलेल्या प्रवाशांकडे जातात आणि त्यांच्याकडून त्याना पाहिजे असलेल्या स्थानकाचे तिकीटाचे पैसे घेऊन तात्काळ तिकीट देतात. पर्यायी व्यवस्थेपद्धतीत त्यांना काउंटरमध्ये बसून तिकीट देण्याची परवानगी देखील आहे.
प्रवाशांना डिजिटल पेमेंट तसेच रोख रकमेने तिकीट खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तिकीट खरेदी अधिक सोपी आणि जलद झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसव्यतिरिक्त भारतीय रेल्वेने नवी दिल्ली, कोलकाता, बेंगलुरू आणि चेन्नई या प्रमुख स्थानकांवर देखील मोबाइल यूटीएस सहाय्यक सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे प्रवाशांचा वेळ वाचतो तसेच रांगा कमी होतात आणि तिकीट खरेदी अधिक सोयीस्कर बनते.
