याशिवाय 129 रुपयांच्या कॉम्बोमध्ये शेजवान राइस किंवा नूडल्स आणि चिली ड्राय मिळत आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चवीचा अनुभव घेता येतो. नॉन- व्हेज प्रेमींसाठी कॅफेमध्ये 289 रुपयांचा एक मोठा कॉम्बो दिला जात आहे ज्यात चिकन फ्राईड राईस, शेजवान चटणी, चिकन चिली ड्राय, चिकन मंचुरियन ग्रेवी आणि चिकन क्रिस्पी यांचा समावेश आहे. याशिवाय वेज फ्राईड राईस / नूडल्स + वेज मंचुरियन ड्राय 139 रुपयांत उपलब्ध आहे. ह्यात नॉनव्हेज देखील उपलब्ध आहे.
advertisement
विशेष म्हणजे कॅफेमध्ये 8 ते 10 विविध प्रकारचे चायनीज कॉम्बो उपलब्ध आहेत ज्यांची किंमत 99 रुपयांपासून 289 रुपयांपर्यंत आहे. कॉलेज समोरील लोकेशन आणि किफायतशीर किंमतींमुळे कॅफे आता तरुणांची आवड बनले आहे. सोयीस्कर लोकेशन आणि चवदार परवडणारे जेवण यामुळे ‘मुंबई वाइब कॅफे’ने दादर- माटुंगा परिसरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अगदी कॉलेजच्या समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांसह अनेक खवय्येगिरींची एकच गर्दी होते.