या स्टॉलवर विविध रंगसंगती, नक्षीदार डिझाइन्स आणि आधुनिक पॅटर्न्सचे कुर्ते उपलब्ध असून सणासुदीच्या काळात खरेदीसाठी येथे मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तरुणींपासून गृहिणींपर्यंत अनेक महिला येथे आवर्जून भेट देत आहेत. येथे लाँग कॉटन कुर्ते केवळ 500 रुपयांना उपलब्ध असून त्यामध्ये विविध रंगांचे आकर्षक पर्याय पाहायला मिळतात.
Success Story : इंजिनिअर तरुणाची कमाल, शिंपल्यातून वर्षाला कमावले 30 लाख, एकदा प्रयोग पाहाच!
advertisement
तसेच शॉर्ट कुर्ते फक्त 300 रुपयांपासून उपलब्ध असून त्यातही अनेक रंगसंगती ग्राहकांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या सर्व कुर्त्यांमध्ये M साइजपासून 6XL आणि 7XL पर्यंतचे साइजेस उपलब्ध असल्याने प्रत्येक वयोगटातील आणि शरीरयष्टीतील महिलांना येथे योग्य पर्याय मिळत आहे.
याशिवाय कुरेशिया पॅटर्नचे कुर्तेही 500 रुपयांना उपलब्ध असून त्यातही विविध रंग आणि साइजेस आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे दुपट्टे 150 ते 250 रुपयांपर्यंत उपलब्ध असून त्यासोबत लखनवी पँटही केवळ 500 रुपयांपर्यंत मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण पेहराव एकाच ठिकाणी आणि परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळत आहे.
हा स्टॉल दादर पूर्व भागात, साधना हॉटेलसमोर आणि आर्या फॅब्रिकच्या शेजारी आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर कमी दरात फॅशनेबल कपड्यांची खरेदी करण्यासाठी हा स्टॉल एक उत्तम पर्याय आहे.





