advertisement

GK : लिफ्टमध्ये शिरताच मोबाईलचे 'सिग्नल्स' का गायब होतो? 99% लोकांना माहित नाही यामागचं वैज्ञानिक कारण

Last Updated:

या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मोबाईलमध्ये नाही, तर त्या लिफ्टच्या बांधणीत दडलं आहे. चला तर मग, यामागचं रंजक विज्ञान समजून घेऊया.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : असं तुमच्यासोबत ही झालंय का की, तुम्ही तुमच्या ऑफिसच्या किंवा बिल्डिंगच्या खाली उभे आहात, फोनवर एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि मोबाईलमध्ये नेटवर्कचे फुल सिग्नल्स दिसत आहेत. पण, बोलता बोलता जसे तुम्ही लिफ्टमध्ये पाऊल ठेवता, समोरचा आवाज अचानक बंद होतो किंवा आपला आवाज समोरच्याला जात नाही? हे जवळ-जवळ सगळ्यांसोबतच होतं, अशावेळी अनेकदा लोक आधीच समोरच्या व्यक्तीला सांगतात की थांब जरा लिफ्टमध्ये आहे आवाज कट होईल. म्हणजेच काय तर लिफ्टमध्ये गेलो की नेटवर्क जातं आणि आवाज कट होतं. हे तर सगळ्यांनाच माहित आहे, पण असं का होतं? यामागचं कारण क्वचितच कोणाला माहित असेल.
या प्रश्नाचं उत्तर तुमच्या मोबाईलमध्ये नाही, तर त्या लिफ्टच्या बांधणीत दडलं आहे. चला तर मग, यामागचं रंजक विज्ञान समजून घेऊया.
1. लिफ्ट म्हणजे सिग्नल्ससाठी एक लोखंडी पिंजरा
लिफ्टमध्ये नेटवर्क न येण्याचं सर्वात मुख्य कारण म्हणजे तिची बांधणी आणि वापरलेलं साहित्य. तांत्रिक भाषेत सांगायचं तर, लिफ्ट एक फॅराडे केज (Faraday Cage) सारखं काम करते.
advertisement
बहुतेक लिफ्टचे बॉक्सेस हे जाड स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले असतात. धातू हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा सर्वात मोठा शत्रू आहे. हे धातूचे थर बाहेरून येणाऱ्या लहरींना आत शिरू देत नाहीत.
केवळ लोखंड किंवा स्टीलच नाही, तर लिफ्टला अधिक सुंदर बनवण्यासाठी त्यावर टाइल्स, लॅमिनेट आणि कधीकधी जाड वॉलपेपरच्या लेयर्स लावल्या जातात. हे सर्व स्तर मिळून मोबाईल सिग्नल्ससाठी एक अभेद्य भिंत तयार करतात.
advertisement
2. लिफ्ट शाफ्टची रचना
ज्या पोकळीतून लिफ्ट वर-खाली जाते, त्याला लिफ्ट शाफ्ट म्हणतात. हा शाफ्ट काँक्रीट, सिमेंट आणि विटांनी बनलेला असतो. काँक्रीटच्या जाड भिंती आणि त्यामध्ये असलेले लोखंडी सळईचे जाळे मोबाईल टॉवरपासून येणाऱ्या लहरींची ताकद पूर्णपणे शोषून घेतात. परिणामी, लिफ्टमध्ये पोहोचण्यापूर्वीच सिग्नल अत्यंत कमकुवत झालेला असतो आणि आत शिरल्यावर तो पूर्णपणे संपतो.
advertisement
3. अशा वेळी काय करावं?
लिफ्टमध्ये नेटवर्क गायब होणं ही एक तांत्रिक मर्यादा आहे, त्यामुळे अशा स्थितीत काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे:
शांत राहा: लिफ्टमध्ये नेटवर्क नाही म्हणून घाबरून जाऊ नका. जसा लिफ्टचा दरवाजा उघडेल, तसे सिग्नल्स पुन्हा सक्रिय होतील.
लिफ्ट अडकल्यास काय करावे?: जर तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट मध्येच अडकली आणि फोनला रेंज नसेल, तर मोबाईलवर वेळ वाया घालवू नका. लिफ्टमध्ये असलेल्या अलार्म बटणाचा वापर करा किंवा तिथल्या इंटरकॉमद्वारे सुरक्षा रक्षकांशी संपर्क साधा.
advertisement
जर तुम्ही महत्त्वाच्या व्यावसायिक मीटिंगमध्ये असाल किंवा कोणाला महत्त्वाची माहिती देत असाल, तर लिफ्टमध्ये शिरण्यापूर्वी कॉल होल्डवर ठेवा किंवा पूर्ण करून मगच आत जा.
तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असलं, तरी विज्ञानाचे काही नियम बदलता येत नाहीत. लिफ्टमधील नेटवर्क गायब होणं हे त्या विज्ञानाचाच एक भाग आहे. त्यामुळे पुढच्या वेळी लिफ्टमध्ये रेंज गेल्यावर फोनला दोष देण्याऐवजी, त्या मजबूत पोलादी रचनेचं कौतुक करा जी तुम्हाला सुरक्षितपणे वर-खाली घेऊन जाते.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
GK : लिफ्टमध्ये शिरताच मोबाईलचे 'सिग्नल्स' का गायब होतो? 99% लोकांना माहित नाही यामागचं वैज्ञानिक कारण
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement