वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर होणार 2 वेळची चॅम्पियन? पाकिस्तानने वेस्ट इंडिजलाही खड्ड्यात घातलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
बांगलादेशने नुकताच पाकिस्तानचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव केला. बांगलादेशच्या या विजयामुळे वनडे वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशन रेसमध्येही मोठे बदल झाले आहेत.
मुंबई : बांगलादेशने नुकताच पाकिस्तानचा वनडे सीरिजमध्ये 2-1 ने पराभव केला. बांगलादेशच्या या विजयामुळे वनडे वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशन रेसमध्येही मोठे बदल झाले आहेत. ढाकाच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये बांगलादेशने 290 रन केले आणि 11 रनने विजय मिळवला. या विजयामुळे बांगलादेश क्रिकेटची वनडे क्रमवारी सुधारणार आहे. बांगलादेश सध्या 10व्या क्रमांकावर आहे. पण बांगलादेशच्या या विजयामुळे 2 वेळची चॅम्पियन वेस्ट इंडिजचं टेन्शन वाढलं आहे.
पाकिस्तानचा पराभव, वेस्ट इंडिज टेन्शनमध्ये
पाकिस्तानच्या या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या वनडे वर्ल्ड कपच्या क्वालिफिकेशनला धक्का लागला आहे. आयसीसीच्या नव्या क्रमवारीमध्ये बांगलादेश 10व्या क्रमांकावरून 9व्या क्रमांकावर पोहोचेल. तर वेस्ट इंडिज 9व्या क्रमांकावरून 10व्या क्रमांकावर जाईल. पाकिस्तानचा सीरिजमध्ये पराभव झाला तरी ते चौथ्या क्रमांकावर राहतील, पण त्यांचे पॉईंट्स थोडे कमी होतील.
2027 वनडे वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये होणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 14 टीम सहभागी होणार आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे आयोजक असल्यामुळे आधीच क्वालिफाय झाल्या आहेत. उरलेल्या 8 टीम या आयसीसी वनडे क्रमवारीतल्या टॉप-8 टीम असतील, दक्षिण आफ्रिका आधीच टॉप-8 मध्ये आहे त्यामुळे 9व्या क्रमांकाची टीम वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट क्वालिफाय होईल, पण 10व्या आणि त्याखालच्या क्रमवारी असलेल्या टीमना क्वालिफायर मॅच खेळाव्या लागतील.
advertisement
वेस्ट इंडिजला रँकिंग सुधारावी लागणार
पाकिस्तानच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण मॅच न खेळताच त्यांची क्रमवारी घसरणार आहे. वेस्ट इंडिजची पुढची वनडे सीरिज सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये भारताविरुद्ध होणार आहे, पण या सीरिजमध्ये त्यांचा पराभव झाला तर त्यांच्यावर क्वालिफायर खेळण्याची नामुष्की ओढवू शकते. 1975 आणि 1979 अशा दोनदा वनडे वर्ल्ड कप जिंकलेल्या वेस्ट इंडिजला मागच्या वनडे वर्ल्ड कपमध्येही क्वालिफाय होता आलं नव्हतं. 2023 वनडे वर्ल्ड कपसाठीही वेस्ट इंडिजने क्वालिफायर सामने खेळले होते, पण त्यांना पराभवाचा धक्का बसला होता.
advertisement
दुसरीकडे बांगलादेशने या विजयासोबतच 2027 वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट क्वालिफाय होण्यासाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे. आता डिसेंबर महिन्यात बांगलादेश दक्षिण आप्रिकेविरुद्धची सीरिज खेळणार आहे, या सीरिजमध्ये चांगली कामगिरी केली तर बांगलादेशचं वनडे वर्ल्ड कपमध्ये थेट क्वालिफाय होणं जवळपास निश्चित होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 10:16 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
वनडे वर्ल्ड कपमधून बाहेर होणार 2 वेळची चॅम्पियन? पाकिस्तानने वेस्ट इंडिजलाही खड्ड्यात घातलं!







