advertisement

Pune News : शाळेतून घरी आला,कपडे बदलून खेळायला गेला, नंतर शेतात... कुटुंबियांनी हंबरडा फोडला

Last Updated:

शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 pune news
pune news
Pune News : सचिन तोडकर, प्रतिनीधी,शिरूर/पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत सहावीत शिकणाऱ्या एका मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खरं तर हा मुलगा शाळेतू घरी आला त्यानंतर कपडे बदलून खेळायला गेला होता.त्यानंतर अचानक त्याचा मृतदेह शेतात सापडला होता. साई मांजरे असे या मृत मुलाचे नाव आहे.शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्तीत ही घटना घडली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने ग्रामस्थ प्रचंड आक्रामक झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नसून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत साई मांजरे हा तळेगाव ढमढेरे येथील शाळेत शिक्षण घेत होता. आज दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून तो खेळण्यासाठी शेताकडे गेला होता. त्यानंतर त्याच भागात त्याचा मृतदेह आढळून आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. यावेळी मुलाच्या डोक्याला मार लागला आहे आणि त्याच्या अंगावर पॅन्ट नाही आहे. त्यामुळे ही हत्या आहे की हा घातपात झाला आहे? याचा उलगडा होत नाही आहे.
advertisement
या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रामक झाले असून मुलाचा मृतदेह घटनास्थळावरून हलविण्यास ग्रामस्थांनी विरोध केला असून जोपर्यंत घटनेचा पूर्ण उलगडा लागत नाही व तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत मृतदेह हलवणार नसल्याची ग्रामस्थांनी भूमिका घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर वनविभागाची टीमही घटनास्थळी दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : शाळेतून घरी आला,कपडे बदलून खेळायला गेला, नंतर शेतात... कुटुंबियांनी हंबरडा फोडला
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement