TRENDING:

Views साठी नाही तर... मयुरेशची सिंपल स्टोरी, ‘पाप पुण्य का हिसाब’चा सोशल इम्पॅक्ट

Last Updated:

सोशल मीडियावर सकारात्मक बदल घडवणाऱ्या तरुणांमध्ये दादरचा मयुरेश गुजर हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. त्याने सुरू केलेली ‘पाप पुण्य का हिसाब’ ही सिरीज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: आजच्या काळात सोशल मिडिया हे सर्वात भक्कम माध्यम समजलं जातं. कारण, अनेक तरुणाई या प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असते आणि कोणत्याही विषयावर इथे पटकन आपली मत मांडता येतात किंवा आपला विचार लोकांपर्यंत सहज अवघ्या काही सेकंदात पोहोचवता येतो आणि हीच गोष्ट अनेक तरुण मनावर घेत वेगवेगळ्या विषयांवरील अनेक गोष्टी आहेत ज्या ते सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. असेच आता सोशल मीडियावर सकारात्मक बदल घडवणाऱ्या तरुणांमध्ये दादरचा मयुरेश गुजर हे नाव सध्या विशेष चर्चेत आहे. त्याने सुरू केलेली ‘पाप पुण्य का हिसाब’ ही सिरीज आज सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचली आहे, फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी नव्हे तर खऱ्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी ओळखली जाते.
advertisement

मयुरेशला लहानपणापासून क्रिकेटची आवड. त्याने पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. पण नोकरी करण्याऐवजी सरळ कंटेंट क्रिएटर म्हणून त्याने काम सुरू केलं. एका मित्राने दिलेल्या चॅलेंजमधून त्याने ठरवलं, “शंभर दिवस काहीतरी समाजासाठी करायचं.” याच विचारातून ही सीरीज जन्माला आली आणि आज जवळपास मयुरेशने या सीरीजच्या माध्यमातून दीडशेपेक्षा जास्त गरजू व्यक्तींना मदत केली आहे. या सिरीजमध्ये तो मुंबईमध्ये असलेल्या बेघर, घरापासून दूर गेलेले, कचर्‍यात वेचणारे, आर्थिक अडचणीत अडकलेले अशा अनेक लोकांना भेटतो. त्यांच्याशी बोलतो आणि त्यांची खरी गोष्ट एका मिनिटांच्या व्हिडिओत लोकांपर्यंत पोहोचवतो. त्याच्या या व्हिडिओंची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते. त्याचे लाखो फॉलोवर्स दररोज त्याचे कौतुक करत असतात.

advertisement

‘पाप पुण्य का हिसाब’च्या सीरिजमधील व्हिडिओंना मिलियन्समध्ये व्ह्यूज मिळालेत. पण महत्त्वाचं म्हणजे फक्त व्ह्यूज नाही, तर

1) या सिरीजने खऱ्या आयुष्यात मोठा बदल घडवला आहे.

2) काहींना थेट आर्थिक मदत मिळाली.

3) कचर्‍यात झोपणाऱ्या किंवा फुटपाथवर राहणाऱ्या लोकांना घर मिळालीये.

4) आई- वडिलांनी टाकून दिलेली मुलं- मुली किंवा मुलांनी टाकून दिलेले ज्येष्ठ नागरिक पुन्हा कुटुंबाशी जोडले गेले.

advertisement

5) उपचाराची गरज असणार्‍यांना औषधं आणि हॉस्पिटल खर्च मिळाला.

6) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, समाजाचा या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात झाली.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात पुन्हा सुधारणा, कांद्याला आणि मक्याला काय मिळाला आज भाव? Video
सर्व पहा

मयुरेशच्या व्हिडिओंनी लोकांना फक्त भावनिक नाही तर प्रेरित केलं. अनेक तरुणांनी त्याच्या व्हिडिओंनंतर रस्त्यावर, स्टेशनवर किंवा झोपडपट्टीत गरजूंना मदत करायला सुरुवात केली. आज त्याची सिरीज लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट बनली आहे. त्यामुळेच मयुरेशने ठरवलं आहे की तो आता पूर्णवेळ कंटेंट क्रिएशन करत राहील आणि गरजूंना मदत करण्यासाठी आणखी प्रकल्प राबवेल. कंटेंट क्रिएशन फक्त मनोरंजनापुरतं मर्यादित नसून, समाजात बदल घडवण्याचं मोठं साधन होऊ शकतं, हे मयुरेशने सिद्ध करून दाखवलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Views साठी नाही तर... मयुरेशची सिंपल स्टोरी, ‘पाप पुण्य का हिसाब’चा सोशल इम्पॅक्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल