दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला उधाण
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला उधाण येत असते. याबाबत पालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येते. यंदाही 18 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. उधाणाच्या काळात समुद्रात साडेचार मीटर पेक्षा अधिक उंचीच्या लाटा निर्माण होतात. तसेच भरतीच्या काळात अतिवृष्टी झाल्यास आणखी एक संकट निर्माण होतं. शहरातील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेकडून पूर्वीच उधाणाचे दिवस जाहीर केले जातात.
advertisement
Mumbai Water: मुंबईकरांवर जलसंकट! BMC च्या निर्णयानं वाढलं टेन्शन, थेट पाणीपुरवठाच बंद होणार!
उधाणाचे दिवस
यंदा जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या 4 महिन्यांत 18 दिवस उधाणाचे असणार आहेत. जून महिन्यात 24, 25, 26, 27 आणि 28 जून हे 5 दिवस उधाणाचे असणार आहेत. या 5 दिवसांत सकाळी 11.15 ते दुपारी 2.26 या दरम्यान समुद्राला उधाण येणार असून साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात 24, 25, 26 आणि 27 या दिवशी समुद्राला उधाण येईल. ऑगस्ट महिन्यात 10, 11, 12, 23 आणि 24 या 5 दिवशी उधाण येण्याची शक्यता आहे. तर सप्टेंबर महिन्यात 8 ते 11 सप्टेंबर दरम्यान 4 दिवस समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे.
चौपाटीवर जाणं टाळा
समुद्राला उधाण आल्यानंतर अनेक पर्यटक या दिवशी आवर्जून उसळणाऱ्या लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी चौपाटीवर जातात. परंतु, अशा दिवशी चौपाटीवर जाणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांना मज्जाव करण्यात येणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ज्या दिवशी समुद्राला उधाण येणार आहे, त्या दिवशी पालिकेसह पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील बंदोबस्त समुद्र किनारी ठेवण्यात येणार आहे.