Mumbai Water: मुंबईकरांवर जलसंकट! BMC च्या निर्णयानं वाढलं टेन्शन, थेट पाणीपुरवठाच बंद होणार!

Last Updated:

Mumbai Water Supply: धरणात पाणीसाठी कमी त्यात टँकर कोंडी यानंतर मुंबईकरांवर आणखी एक जलसंकट ओढावलं आहे. आता मुंबई महापालिका थेट पाणीपुरवठाच खंडित करणार आहे.

Mumbai Water: मुंबईत पाणीबाणी! BMC च्या निर्णयानं वाढलं टेन्शन, थेट पाणीपुरवठाच बंद होणार!
Mumbai Water: मुंबईत पाणीबाणी! BMC च्या निर्णयानं वाढलं टेन्शन, थेट पाणीपुरवठाच बंद होणार!
मुंबई : ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर मुंबईत पाण्याची टंचाई गंभीर बनत चालली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांतील साठा केवळ 32 टक्क्यांवर येऊन पोहोचला असून, त्यात भर म्हणून टँकरचालकांनी बंद पुकारल्याने अनेक भागांत पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. त्यातच महापालिकेच्या एका निर्णयानं पुन्हा जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
तर पाणीपुरवठा लगेच खंडित
महापालिकेने वॉर्डस्तरावर बेकायदा नळजोडण्यांवर कारवाई करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत जलजोडणी वैध आहे का, याची तपासणी केली जाणार आहे. अनधिकृत जोडण्या तात्काळ खंडित करण्यात येणार आहेत. शिवाय, घरगुती वापरासाठी मंजूर नळजोडणी जर व्यावसायिक वापरासाठी आढळली, तर त्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
advertisement
रोज 30 टक्के पाणी वाया
मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, दररोज सुमारे 4 हजार दशलक्ष लिटर पाणी शहराला पुरवठा केला जातो. मात्र त्यातील 30 टक्क्यांहून अधिक पाणी गळती आणि बेकायदा नळजोडणीतून वाया जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
नागरिकांची मागणी
'एम पूर्व' विभागातील बैंगणवाडी, गजानन कॉलनी, लोटस कॉलनी, अब्दुल हमिद मार्ग आणि शिवाजीनगर परिसरात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. स्थानिकांकडून मात्र पालिकेच्या या कारवाईला तीव्र विरोध होत आहे. नागरिकांची मागणी आहे की, आधी जलजोडणीसंदर्भातील प्रक्रिया सुलभ केली जावी, नंतर कारवाई केली जावी.
advertisement
33 टक्के झोपडपट्टीत अधिकृत नळजोडणी नाही
2022 मध्ये लागू झालेल्या ‘सर्वांसाठी पाणी’ धोरणाअंतर्गत आतापर्यंत सुमारे 18 हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील 14 हजार अर्जदारांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही सुमारे 33 टक्के झोपडपट्टीतील रहिवाशांकडे अधिकृत नळजोडणी नाही. त्यामुळे त्यांना खासगी स्त्रोतांवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यासाठी महिन्याला 800 ते 1500 रुपयांपर्यंतचा खर्च सहन करावा लागतो.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Water: मुंबईकरांवर जलसंकट! BMC च्या निर्णयानं वाढलं टेन्शन, थेट पाणीपुरवठाच बंद होणार!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement