अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
प्रसार भारतीच्या दूरदर्शन केंद्रे, आकाशवाणी आणि कमर्शियल ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसमध्ये या पदांसाठी उमेदवारांची निवड होईल. एकूण 14पदांसाठी ही भरती जाहीर केली गेली आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2026 आहे,त्यामुळे 15 दिवसांच्या आत अर्ज करणे गरजेचे आहे. भरती दोन वर्षांच्या करारावर केली जाणार आहे.
advertisement
पगार आणि फायदे एकत्र जाणून घ्या
पगार शहरानुसार बदलतो. चैन्नई, हैदराबाद, मुंबई आणि कोलकत्तामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 35,000 ते 50,000 रुपये पगार मिळणार आहे. इतर शहरांसाठी पगार 35,000 ते 42,000 रुपये आहे.
अर्जदारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीए, एमबीए मार्केटिंग किंवा पीजी डिप्लोमा मॅनेजमेंट,मार्केटिंग केलेले असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला कामाचा किमान एक वर्षाचा अनुभव असावा. ही नोकरी तुमच्या करिअरसाठी मोठी संधी आहे. इच्छुकांनी शक्य तितक्या लवकर अर्ज करणे गरजेचे आहे आणि प्रसार भारतीसारख्या प्रतिष्ठित संस्थेत आपले भविष्यातील करिअर घडवावे.
