तिळपोळीला लागणारं साहित्य
तीळ, गूळ सव्वा वाटी, वेलची पावडर, गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेल हे साहित्य लागेल.
तिळपोळी कृती
सुरुवातीला 1 वाटी तीळ मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेले तीळ कॉटनच्या कापडावर पसरवून गार करा. तीळ गार होईपर्यंत गव्हाची कणिक मळून घ्या. एक वाटी गव्हाचे पीठ चाळून त्यात थोडे मीठ, 2 टेबल स्पून मैदा आणि तेल घालून सर्व साहित्य कोरडे मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून खूप पातळ किंवा घट्ट न होईल अशी मऊ कणिक मळा. कणिक मळून झाल्यावर ती 15-20 मिनिटे भिजण्यासाठी ठेवा.
advertisement
त्यानंतर सारण तयार करा. यासाठी भाजलेले तीळ, सव्वा वाटी चिरलेला गूळ आणि वेलची पावडर मिक्सरमध्ये घेऊन अर्धवट बारीक करून घ्या. कणिक भिजून झाल्यावर पोळी बनवायला सुरुवात करा. कणिकेचा छोटा गोळा घेऊन पारी तयार करा. त्यात सारण भरून मध्यम आकाराची पोळी लाटा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल लावून पोळी दोन्ही बाजूंनी मंद ते मिडीयम आचेवर भाजा. पोळी लगेच खाणार असाल तर तूप लावूनही भाजता येईल, पण उशीर असेल तर तेलाचाच वापर करा. अशा प्रकारे तिळपोळी तयार होईल. या मकर संक्रांतीला ही तिळपोळी नक्की करून बघा.





