Chimbori Rassa Recipe : अस्सल झणझणीत, मसालेदार आगरी पद्धतीनं बनवा चिंबोरी रस्सा, रेसिपीचा Video

Last Updated:

चिंबोरी थंडीत खाणे महत्त्वाचे मानले जाते कारण शरीराला उष्णता आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात चिंबोरीमधून मिळत असतो.

+
झणझणीत

झणझणीत आगरी पद्धतीत चिंबोरी रस्सा 

कल्याण : चिंबोरी थंडीत खाणे महत्त्वाचे मानले जाते कारण शरीराला उष्णता आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात चिंबोरीमधून मिळत असतो. त्यामुळे बहुतांश लोक उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात चिंबोरी खाणे टाळतात परंतु हिवाळ्यात आवर्जून याचे सेवन केले जाते. आज आपण आगरी पद्धतीतले झणझणीत मसालेदार चिंबोरी रस्सा कसा बनवायचा बघणार आहोत. जे भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते.
चिंबोरी रस्सा साहित्य:
चिंबोऱ्या (स्वच्छ केलेल्या), मोठे कांदे 2 (बारीक चिरलेला), टोमॅटो 1 (बारीक चिरलेला), खोबऱ्याचं वाटण (भाजलेला खोबरं, लसूण, आले, जिरे, कोथिंबीर), आगरी मसाला (घरगुती लाल तिखट, गरम मसाला, हळद), सुकवलेला आंबा /चिंचेचा कोळ, बेसन (आवश्यकतेनुसार)
मीठ, तेल हे साहित्य लागेल.
advertisement
चिंबोरी बनवण्याची कृती:
तयारी: स्वच्छ केलेल्या चिंबोऱ्यांना हळद आणि मीठ लावून घ्या. खोबऱ्याचं वाटण तयार करा.
वाटण परतणे: कढईत तेल गरम करून त्यात कांदा मऊ होईपर्यंत परता. नंतर टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परता.
मसाले घालणे: यात तयार वाटण, हळद, गरम मसाला, लाल तिखट घालून तेल सुटेपर्यंत चांगले परता.
बेसन मिसळणे: आता चिंचेचा कोळ आणि गरजेनुसार बेसन घालून एकजीव करा. मिश्रण थोडे घट्ट होऊ द्या.
advertisement
चिंबोरी भरणे (पर्यायी): तयार वाटण थंड करून चिंबोऱ्यांमध्ये भरा.
रस्सा बनवणे: परतलेल्या मसाल्यात आवश्यकतेनुसार पाणी (गरम पाणी उत्तम) आणि मीठ घालून उकळी आणा.
शिजवणे: भरलेल्या चिंबोऱ्या किंवा अख्ख्या चिंबोऱ्या रस्स्यात सोडा आणि चिंबोरी शिजेपर्यंत आणि रस्स्याला चांगली चव येईपर्यंत शिजू द्या.
सर्व्ह करणे: गरमागरम चिंबोरीचा झणझणीत रस्सा भाकरी, चपाती किंवा भातासोबत खा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Chimbori Rassa Recipe : अस्सल झणझणीत, मसालेदार आगरी पद्धतीनं बनवा चिंबोरी रस्सा, रेसिपीचा Video
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement