बदललेली विचारसरणी आणि व्यवसायाचा श्रीगणेशा
हर्षालीने शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ नोकरी केली. मात्र, नोकरीत केवळ वेळ जात असून वैयक्तिक प्रगती खुंटल्याची जाणीव तिला झाली. स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसायाशिवाय पर्याय नाही, हे ओळखून तिने सिझनेबल व्यवसायात पाऊल ठेवले. सुरुवातीला घरच्यांनी चांगले शिक्षण झाले आहे, आरामात नोकरी कर असा सल्ला दिला, पण हर्षाली आपल्या निर्णयावर ठाम होती.
advertisement
राख्यांपासून चॉकलेट बाऊलपर्यंतचा प्रवास
हर्षालीच्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात रक्षाबंधनानिमित्त राख्या विक्री करण्यापासून झाली. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या आर्थिक यशामुळे घरच्यांचा विश्वास वाढला आणि तिला कुटुंबाचा खंबीर पाठिंबा मिळाला. आज हर्षाली तिचा चौथा यशस्वी व्यवसाय सांभाळत आहे. सध्या ती स्ट्रॉबेरी डेझर्ट आणि चॉकलेट बाऊल विक्रीचा व्यवसाय मोठ्या उत्साहात करत आहे.
हर्षालीचे यशाचे सूत्र
नोकरीपेक्षा व्यवसायातून अधिक आर्थिक आणि मानसिक समाधान मिळते. तसेच काळाची गरज ओळखून नवनवीन उत्पादने बाजारात आणणे ही आवड जोपासून तिने पुढे पाऊल ठेवले. तसेच नोकरीची संधी चालून आली तरी आता व्यवसायातच मन रमत असल्याचे ती अभिमानाने सांगते.
मला माझे स्वतःचे अस्तित्व निर्माण करायचे होते. नोकरीत मी इतरांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम केले असते, पण व्यवसायात मी माझी स्वतःची स्वप्ने जगत आहे. आता कितीही मोठी नोकरी मिळाली, तरी मी माझा व्यवसायच पुढे नेणार असे ही नाशिकची तरुण उद्योजिका सांगते.