Makar Sankranti Recipe : मकर संक्रांतीला अशी बनवा काठोकाठ सारण भरलेली तिळपोळी, टिकेल 10 दिवस, रेसिपी संपूर्ण Video

Last Updated:

अनेक गृहिणींना पोळी बनवताना सारण काठापर्यंत पसरत नाही ही समस्या येते, परंतु या पद्धतीने बनवल्यास सारण पोळीच्या कडपर्यंत जाईल. ही पोळी 8-10 दिवस टिकणारी सुद्धा असेल.

+
या

या मकर संक्रांतीला अशा पद्धतीने करा काटोकाट सारण भरलेली तिळपोळी

पुणे: येत्या 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांती म्हटलं की तीळ-गुळाचे लाडू बनवले जातात, पण नैवेद्यासाठी तिळपोळीला विशेष महत्त्व आहे. अनेक गृहिणींना पोळी बनवताना सारण काठापर्यंत पसरत नाही ही समस्या येते, परंतु या पद्धतीने बनवल्यास सारण पोळीच्या कडपर्यंत जाईल. ही पोळी 8-10 दिवस टिकणारी सुद्धा असेल. ही रेसिपी वसुंधरा पाटुकले यांनी बनवून दाखवली आहे.
तिळपोळीला लागणारं साहित्य
तीळ, गूळ सव्वा वाटी, वेलची पावडर, गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, तेल हे साहित्य लागेल.
तिळपोळी कृती
सुरुवातीला 1 वाटी तीळ मंद आचेवर भाजून घ्या. भाजलेले तीळ कॉटनच्या कापडावर पसरवून गार करा. तीळ गार होईपर्यंत गव्हाची कणिक मळून घ्या. एक वाटी गव्हाचे पीठ चाळून त्यात थोडे मीठ, 2 टेबल स्पून मैदा आणि तेल घालून सर्व साहित्य कोरडे मिक्स करा. आवश्यकतेनुसार पाणी घालून खूप पातळ किंवा घट्ट न होईल अशी मऊ कणिक मळा. कणिक मळून झाल्यावर ती 15-20 मिनिटे भिजण्यासाठी ठेवा.
advertisement
त्यानंतर सारण तयार करा. यासाठी भाजलेले तीळ, सव्वा वाटी चिरलेला गूळ आणि वेलची पावडर मिक्सरमध्ये घेऊन अर्धवट बारीक करून घ्या. कणिक भिजून झाल्यावर पोळी बनवायला सुरुवात करा. कणिकेचा छोटा गोळा घेऊन पारी तयार करा. त्यात सारण भरून मध्यम आकाराची पोळी लाटा. तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे तेल लावून पोळी दोन्ही बाजूंनी मंद ते मिडीयम आचेवर भाजा. पोळी लगेच खाणार असाल तर तूप लावूनही भाजता येईल, पण उशीर असेल तर तेलाचाच वापर करा. अशा प्रकारे तिळपोळी तयार होईल. या मकर संक्रांतीला ही तिळपोळी नक्की करून बघा.
view comments
मराठी बातम्या/रेसिपी/
Makar Sankranti Recipe : मकर संक्रांतीला अशी बनवा काठोकाठ सारण भरलेली तिळपोळी, टिकेल 10 दिवस, रेसिपी संपूर्ण Video
Next Article
advertisement
ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement