आरोग्यासाठी अतिशय गुणकारी, शेवग्याच्या पानांची करा चटणी, रेसिपीचा सोपा Video

Last Updated:

शेवगा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. दररोजच्या जेवणात शेवगा घेतल्यास अनेक आजारांना आळा घालता येतो.

+
Healthy

Healthy Chutney

अमरावती : शेवगा हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानला जातो. दररोजच्या जेवणात शेवगा घेतल्यास अनेक आजारांना आळा घालता येतो. पण, दररोज आहारात शेवगा घ्यायचा कसा? तर शेवग्याच्या पानांची चटणी बनवून तुम्ही आहारात घेऊ शकता. अगदी कमीत कमी साहित्यात टेस्टी अशी चटणी तयार होते. शेवग्याच्या पानांची चटणी कशी बनवायची? ती रेसिपी जाणून घेऊ.
शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 मोठी वाटी शेवग्याची पाने, छोटी वाटी हरभरा डाळ, 3 ते 4 लाल मिरची, जिरे, कढीपत्ता, धने, शेंगदाणे, तेल, मीठ, आमचूर पावडर आणि साखर हे साहित्य लागेल.
advertisement
शेवग्याच्या पानांची चटणी बनवण्याची कृती 
सर्वात आधी गॅसवर कढईत तेल टाकून घ्यायचे आहे. तेल गरम झाले की, जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे तळतळले की, त्यात लाल मिरची टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात धने, हरभरा डाळ, शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे. हे सर्व साहित्य कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर हे थंड करून घ्यायचं.
advertisement
तोपर्यंत कढीपत्ता आणि शेवग्याची पाने भाजून घ्यायची आहे. त्याच कढईत उरलेल्या तेलात कढीपत्ता आणि शेवग्याची पाने कुरकुरीत करून घ्यायची आहे. त्यानंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधून बारीक करू शकता. किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. वाटून घेताना त्यात मीठ, आमचूर पावडर आणि साखर टाकून घ्यायची आहे. बारीक करून घेतली की, आरोग्यवर्धक अशी चटणी तयार झालेली असेल. कमीत कमी साहित्यात टेस्टी अशी चटणी होते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यासाठी अतिशय गुणकारी, शेवग्याच्या पानांची करा चटणी, रेसिपीचा सोपा Video
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement