TRENDING:

Mumbai News: सागाच्या लाकडाची खेळणी, फक्त 60 रुपयांपासून; ठिकाण माहितीये का? 

Last Updated:

सावंतवाडीची पारंपरिक कलाकुसर आणि सागवान लाकडाच्या समृद्ध वारशाची ओळख जपत “आम्ही सावंतवाडीकर” या स्थानिक ब्रँडने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सावंतवाडीची पारंपरिक कलाकुसर आणि सागवान लाकडाच्या समृद्ध वारशाची ओळख जपत “आम्ही सावंतवाडीकर” या स्थानिक ब्रँडने ग्राहकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. शुद्ध सागाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेली खेळणी, घरगुती वापरातील वस्तू आणि अँटिक शो पीस यांची मोठी श्रेणी या ब्रँडखाली उपलब्ध असून, उत्कृष्ट गुणवत्ता, टिकाऊपणा आणि कलात्मक नक्षीकाम यामुळे या वस्तूंना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे या सागवानी वस्तूंच्या किंमती केवळ 60 रुपयांपासून सुरू होत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही त्या सहज परवडणाऱ्या ठरत आहेत.
advertisement

“आम्ही सावंतवाडीकर” ब्रँडअंतर्गत दैनंदिन घरगुती वापरासाठी विविध प्रकारच्या सागवानी विळ्या, भाजी कापण्यासाठी खास डिझाइन केलेली साधने, लाकडी चपातीचा डब्बा तसेच स्वयंपाकघरासाठी उपयुक्त अनेक वस्तू उपलब्ध आहेत. याशिवाय सागाचे चॉपिंग बोर्ड 500 ते 800 रुपयांपर्यंत, तर लाकडी मसाजर 60 ते 300 रूपयांपर्यंत मिळतात. लहान मुलांसाठी सुरक्षित, आकर्षक आणि पर्यावरण पूरक लाकडी खुळखुळे 150 ते 200 रुपयांपर्यंत तसेच भातुकली खेळणी सेट 300 ते 800 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. घर आणि ऑफिससाठी उपयुक्त चष्मा स्टँड, पुस्तकांचे नीट व्यवस्थापन करणारे बुक स्टँड, बांगडी स्टँड, पोळपट, लाटण यांसारख्या सागवानी वस्तू ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
रँडला ठार मारण्याआधी चाफेकर बंधूंनी इथं घेतली होती शपथ, ब्रिटिशांनी हीच 'ती' मूर्ती केली होती जप्त, Video
सर्व पहा

याशिवाय शेतकरी जोडी शॉपीस, प्योर सागाचे हँडमेड पिगीबँक, ग्रामोफोन, चष्मा स्टँड 250 ते 350 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या अँटिक व डेकोरेटिव्ह शॉपीसचीही येथे मोठी निवड आहे. या ब्रँडची फॅक्टरी सावंतवाडीत असून, विरार येथे गोदाम आहे. चर्चगेट ते विरारदरम्यान सर्व रेल्वे स्थानकांवर दर 15-15 दिवसांनी स्टॉल लावण्यात येतो. तसेच ग्राहक 7738460115 या क्रमांकावर संपर्क साधून ऑनलाइन ऑर्डर देखील देऊ शकतात.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: सागाच्या लाकडाची खेळणी, फक्त 60 रुपयांपासून; ठिकाण माहितीये का? 
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल