आमच्यामध्ये 20 वर्षाचं अंतर पण...
राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात पहिला फोन कॉल कुणी कोणाला केला? असा सवाल विचारल्यावर आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिलं. आमच्यात एवढ्या चर्चा आणि बैठका झाल्या. त्यामुळे मागील सर्व इतकं ब्लर झालंय की, पहिला फोन कुणी केला हे आम्हाला आठवत देखील नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले. आमच्यामध्ये एवढं 20 वर्षाचं अंतर होतं हे आम्हाला आता जाणवत देखील नाही, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement
एवढं नॅचरली फोन कॉल झाले की...
आम्हा दोघांमध्ये एवढं नॅचरली फोन कॉल झाले की, आम्हाला आठवत देखील नाही की पहिला फोन कॉल कुणी कोणाला केला होता, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल दिली. राजसाहेबांचा महेश मांजरेकर यांच्यासोबतच जो पॉडकास्ट होता, ज्यात ते म्हणाले होते की महाराष्ट्रासाठी आम्ही छोटेमोठे वाद बाजूला ठेवायला तयार आहोत. त्यानंतर संजय राऊतांनी त्यांची मत व्यक्त केलं, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय.
जास्त खेचातान करू नका
दरम्यान, दोन पक्ष विचार आहे. त्यामुळे दोन वेगवेगळे विचार आहेत. पण या मुद्दयावर आम्ही एकत्र आलो. जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांनी दोन्ही बाजूच्या टीमला सांगितलं होतं की, जास्त खेचातान करू नका. जास्त वाद न घातला जागा वाटप झालं पाहिजे. आनंदाच्या वातावरणात जागा वाटप झालं पाहिजे, असं दोघांनी सांगितलं होतं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
