दरम्यान यावेळी बोलताना कदम यांनी काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर देखील जोरदार टीका केली. काँग्रेसच्या गरीबी हटाव घोषणेच काय झालं हे काँग्रेसने सांगावं? असा सवाल कदम यांनी केला आहे. पुढे बोलतना ते म्हणाले की, निवडणुका आल्या की फक्त वारेमाप घोषणा द्यायच्या आणि अंमलबजावणी शुन्य, हे काँग्रेसचे स्वातंत्र्यापासूनचे धंदे आहेत. काँग्रेसच्या मनात होतं तर लाडकी बहीण योजना का सुरू केली नाही ? ये पब्लिक है, सब जानती है, असं कदम यांनी म्हटलं आहे.
advertisement
मुंबईकरांसाठी टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे, यावर प्रतिक्रिया देताना कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. टोल माफीचा निर्णय लोकाभिमुख आहे. कोकणातली जनता सरकारवर आणखी खुश झाली आहे. लोकांचे हजारो रुपये वाचतील. मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो. असे निर्णय घेण्यासाठी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, असं कदम यांनी म्हटलं आहे.