नेमकं काय म्हणाले शरद पवार?
मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे, मनोज जरांगेंची मागणी देखील योग्य आहे. पण इतरांचाही विचार व्हायला हवा असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाबाबत देखील नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या तक्रारीचा विचार करता मुंबई- गोवा महामार्गात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे. याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शरद पवार यांनी केली आहे. आमची सत्ता आली तर कोकणातील हा महामार्ग लोकांच्या अपेक्षेप्रमाणे करू असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. येत्या 30 तारखेपर्यंत जागा वाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल असं शरद पवार यांंनी म्हटलं आहे.