शेतकरी कामगार पक्षाचा रायगड जिल्ह्याच्या काही भागांत पूर्वीपासून प्रभाव राहिलेला आहे. खरंतर शेकापला सोबत घेण्याचा काहीसा फायदा मविआला विधानसभेत नक्की होईल, असं सांगितलं जात आहे. आज निवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना जवळपास दोन तास आधीच जयंत पाटील यांनी मतदान केंद्र सोडलं त्यामुळे त्यांनी पराभव मान्य केल्याचं स्पष्ट झालं होतं. पण मतमोजणीमध्ये पहिल्यापासून शेकपाचे जयंत पाटील पिछाडीवर होते. तीन फेऱ्यानंतरही जयंत पाटलांनी दुहेरी संख्याही गाठता आली नाही.
advertisement
शेकापच्या जयंत पाटलांची शेवटची निवडणूक? शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी विधानपरिषद निवडणुकीच्या आधी मोठी घोषणा केली होती. ही विधानपरिषद निवडणूक आपली शेवटची निवडणूक असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं होतं. कोकण पदवीधर निवडणूक संदर्भात पनवेलमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते. ही माझी शेवटची निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये काँग्रेस आपल्याला मदत करेल का? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. अगदी तीच जयंत पाटलांची भिती खरी ठरल्याचं दिसतंय...
