मुंबई, 23 नोव्हेंबर : शिवसेना अपात्रता आमदार प्रकरणी सुनावणी सुरू आहे. आजही ठाकरे गटाचे नेते आणि तत्कालीन प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे. पण सुनावणीदरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये खडाजंगी पाहण्यास मिळाली. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाराजी व्यक्त केली. तर सुनावणीची प्रक्रिया पार पाडत असताना शिंदेच्या आमदारांबरोबर पक्षपातीपणा केला जात आहे, असा आक्षेप शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे नोंदविला आहे..
advertisement
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणीचा आज सलग तिसरा दिवस आहे. आज ही तत्कालीन प्रतोद सुनिल प्रभू यांची साक्ष नोंदवली जात आहे. त्यासाठी दोन्ही बाजूचे वकील आणि साक्षीदार उपस्थित आहेत. पण आजच्या सुनावणीमध्येही मोठा ड्रामा घडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची आज पुन्हा नाराजी व्यक्त केली. दोन्ही पक्षकार वकील युक्तीवाद करताना विनाकरण वाद करत आहे यामुळे वेळ वाया जातोय, असं नार्वेकर यांनी नमूद केलंय.
तर, सुनावणीची प्रक्रिया पार पाडत असताना शिंदेच्या आमदारांबरोबर पक्षपातीपणा केला जात आहे, असा आक्षेप शिवसेना प्रतोद सुनिल प्रभू यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे नोंदविला आहे. प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी दिलेल्या वेळेत शिंदे गटाने सादर केले नाही. त्यांना वेळ वाढवून दिल्याचे ही आम्हाला माहिती नाही. शिंदे गटाने केवळ साक्षिदारांची नावे नोंदवली आहेत. हे प्रक्रिया पक्षपाती आहे असं या पत्रात म्हटलं आहे.
सुनावणी दरम्यान काय घडलं?
शिंदेंचे वकिल जेठमलानी- आमदार निवासातील किती लोकांना व्हीप बजावण्यात आला.
सुनिल प्रभू- किती लोकांना आमदार निवासात नेऊन दिला हे मला आठवत नाही. पण आमदार निवास आणि काही लोकांना ते आहे तिथे नेऊन दिला होता हे मला आठवते.
शिंदेंचे वकिल जेठमलानी- तुम्ही प्रत्यक्षात जाऊन व्हीप नेऊन दिला नाही. त्यामुळे तो दिला असं कोणत्या आधारे म्हणता?
सुनिल प्रभू- मी सही करून वीप काढतो आणि तो नेऊन देण्याची व्यवस्था करतो. ज्यांना सर्व झाला, मिळाला त्यांच्या सह्या आहेत यावरून मला कळले. त्यांच्या सह्या आमच्या दप्तरी पाटी ॲाफिसमध्ये आहेत.
जेठमलानी- माझे तुम्हाला सांगायचे आहे की, असा कुठलाही रेकॅार्ड नाही. त्यामुळे तुम्ही तो कोर्टात सादर केलेला नाही.
सुनिल प्रभू- हे खोटे आहे.
जेठमलानी- तुम्ही ३७च्या उत्तरात असे म्हणाला की, जे लोक संपर्कात नव्हते त्यांना आम्ही व्हॉट्सअप मेसेज पाठविण्याशिवाय पर्याय नव्हता. यातून आपल्याला असे म्हणायचे आहे का की तुम्ही व्हॉट्सअपवरून पाठविणे योग्य आहे. जे लोक हे बरोबर आहे.
सुनिल प्रभू- माझ्याकडून जातात. त्या सगळ्या धावपळीच मला सगळ्यांना मेसेज पाठवणे शक्य नव्हते. मी व्हीप आहे तेंव्हापासून माझ्या कार्यकाळात चा इतिहास पाहता पक्ष कार्यालयातील कर्मचाऱ्यांमार्फत हा व्हीप दिला जातो किंवा पोहचवला जातो. हे व्हीप मी कार्यालयीन कर्मचारी मनोज चौगुलेंमार्फत पाठविले.
शिंदेंचे वकिल जेठमलानी- तुम्हाला असे म्हणायचे आहे का की, मनोज चौगुले यांच्या फोनवरून ते व्हॉट्सअप करण्यात आला आहे का?
सुनिल प्रभू- मी मनोज चौगुले यांना सांगितले होते की, व्हीप व्हॉट्सअपद्वारे पाठवा त्यांनी ते पाठविले.
जेठमलानी- तुम्हाला कसे कळले की मनोज चौगुले यांनी पाठविले तुम्ही त्यांचा फोन पाहिला की त्यांनी तुम्हाला सांगितले?
सुनिल प्रभू- मनोज चौगुले यांनी मला सांगितले की व्हॉट्सअपवर पाठविले आहेत.
शिंदेचे वकिल जेठमलानी- मी असे म्हणतो की मनोज चौगुलेचा फोन या कोर्टात दाखविला नाही किंवा चौगुले यांना साक्षिदार बनविण्यात आले नाही. किंवा असा कुठलाही व्हॉट्सअप पाठवण्यात आलाच नाही? त्यामुळे असे कुठलेच व्हॉट्सअप तुम्ही पाहिले सुद्धा नाही. त्यामुळे असे व्हीप अस्तित्वात नाही, असे माझे म्हणणे आहे..
सुनिल प्रभू - हे खोटे आहे. जे पाठविले ते ॲान रेकॅार्ड आहे.
शिंदेंचे वकिल- जेव्हा लिखीत व्हीप पाठविला जातो तेव्हा त्याच बैठकीचा अजेंडा लिहिला जातो का?
सुनिल प्रभू- व्हीपमध्ये कारणाचा उल्लेख असतो. एक तर वोटिंग किंवा मिटींग
शिंदेंचे वकिल- या व्हिपमध्ये ज्या बैठकीचा उल्लेख करण्यात आला आहे, त्याचे कारण कोणते आहे?
सुनिल प्रभू- पक्षादेशात कारण नमुद नसते. बैठक बोलवली आहे इतकेच लिहिले असते. व्हीप प्रकारचा असतो. एकतर मतदान नाही तर बैठकीसंदर्भात असतो. हा बैठकीबाबत होता.
शिंदेचे वकिल जेठमलानी- मी तुम्हाला असे म्हणतो की, तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या कारवाई पुढे खोटा व्हीप दाखवत आहात.
सुनिल प्रभू- मी संविधानाची शपथ घेतली आहे. मी जे बोलतो आहे ते सत्य आहे हे जे बोलत आहेत ते खोटे आहे.
शिंदेंचे वकिल जेठमलानी- हे जे डॅाक्यूमेंट आहे कोणी तयार केला आहे?
सुनिल प्रभू- हा पार्टी ॲाफिसमध्ये माझ्या सांगण्यावरून तयार करण्यात आला आहे. माझ्या समोर सह्या करण्यात आल्या आहेत.
शिंदेने वकिल जेठमलानी- या दस्तऐवजाच्या वरती पक्षादेश क्रमांक २/२२ लिहिले आहे ते कुणाचे हस्ताक्षर आहे.
सुनिल प्रभू- हा कार्यालयीन कामकाजाचा भाग आहे.
सुनिल प्रभू- ते कोणाचे हस्ताक्षर आहे. हे मी आता सांगू शकत नाही.
शिंदेंचे वकिल जेठमलानी- हे डॅाक्युमेंट कोणत्या वेळी तयार करण्यात आले?
सुनिल प्रभू- मी वेळ कशी सांगू शकतो. त्याच दिवशी तो तयार करण्यात आला.
शिंदेचे वकिल जेठमलानी- हे दस्त तयार करण्यासाठी तुम्ही कधी सांगितले.
सुनिल प्रभू- ज्या क्षणी व्हीप तयार केला त्याच क्षणी सह्या घेतल्या. त्याच क्षणी व्हीपनंबर लिहायला सांगितला त्याच क्षणी तो द्यायला सुरूवात केली. हा कार्यालयीन कामकाजाचा भागले आहे.
